राज्यातील काही ठिकाणी 2 ते 3 दिवसांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

जुलै महिन्याच्या सुरवातीपासून राज्यासह देशातील अनेक भागांत पावसाने दमदार सुरुवात केली. मात्र पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतली आहे.
या १५ ते २० दिवसांच्या कालावधीत राज्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे काही भागांत पूरपरिस्थितीही निर्माण झाली होती. दरम्यान, पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्यानं येत्या 2 ते 3 दिवसांत राज्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.

दरम्यान, या महिन्यातील पावसाने कोकण, मुबंई, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. पुण्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक पावसाची नोंद २०१४ मध्ये ५३.१ मिलिमीटर तर, त्याआधी १९६७ मध्ये ७१.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. पुढील चार दिवस शहरासह राज्यात अंशतः ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

जून महिन्यातील पावसाचा संभाव्य अंदाजही वर्तवण्यात आला आहे. यामध्ये सामान्य किंवा सामान्य पाऊस भारताच्या वायव्य आणि मध्य भारतात पडेल तसेच असाच पाऊस उत्तर द्वीपकल्प, पूर्वेचा काही भाग आणि ईशान्येकडील काही भागांमध्येही होण्याची शक्यता आहे.