व्हिडिओ न्युज

Video मंदिराला मिळालेल्या देणग्यांच्या वाटपावरून मंदिराचे पुजारी आपापसात भांडत असल्याचा दावा, काय आहे सत्य !


लाइटहाऊस जर्नालिज्मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला एक व्हिडिओ आढळला ज्यामध्ये मंदिराला मिळालेल्या देणग्यांच्या वाटपावरून मंदिराचे पुजारी आपापसात भांडत असल्याचा दावा केला जात आहे.



 

हा नेमका प्रकार कुठे घडला व त्यात देणगीवरून वाद होत असल्याच्या दाव्यात कितपत तथ्य आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

काय होत आहे व्हायरल?

X यूजर @Manishkumarttp ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला होता मात्र आता हा व्हिडीओ डिलीट केल्याचे लक्षात येतेय.

मात्र इतर वापरकर्ते देखील हा व्हिडिओ समान दाव्यासह शेअर करत आहेत.

.

.

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आणि त्यातून कीफ्रेम्स काढून आमचा तपास सुरु केला. आम्ही एका कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केला आणि इंडिया टुडे वेबसाइटवर प्रकाशित झालेली बातमी सापडली.

https://www.indiatoday.in/india/story/tamil-nadu-kancheepuram-vadakalai-thenkalai-sects-clash-varadharaja-perumal-temple-idol-procession-2490196-2024-01-18

जानेवारी २०२४ मध्ये सदर बातमी अपडेट करण्यात आली होती. रिपोर्ट मध्ये नमूद केले आहे: तामिळनाडूच्या कांचीपुरम येथील मंदिराच्या मिरवणुकीदरम्यान बुधवारी अय्यंगारांचे दोन पंथ वडकलाई आणि थेंकलाई यांच्यात भांडण झाले. वरधराजा पेरुमल मंदिरातून भजन गाताना ही घटना घडली होती, मंदिरातील मूर्ती राज्याच्या अनेक जिल्ह्यांतून बाहेर काढली जात होती.

या बातमीत घटनेचा व्हिडिओ देखील होता.

आम्हाला वेगवेगळ्या भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये प्रकाशित झालेल्या विविध माध्यम संस्थांच्या वेबसाइटवरही याविषयीचे वृत्त आढळून आले.

https://www.aajtak.in/india/news/story/brawls-breaks-amid-vadakalai-and-thenkalai-cult-during-temple-procession-in-tamil-nadu-ntc-1861581-2024-01-18

https://ibctamilnadu.com/article/fight-between-vadakalai-and-thenkalai-in-kanchi-1705557505

https://www.tarunbharat.net/Encyc/2024/1/18/Controversy-song-of-Bhajan.html

निष्कर्ष: मंदिराला मिळालेल्या देणगीच्या वाटपावरून मंदिराच्या पुजाऱ्यांमध्ये भांडण झाल्याचा व्हायरल दावा खोटा आहे. या संदर्भात शेअर करण्यात आलेला व्हिडिओ हा या वर्षी जानेवारी महिन्यात कांचीपुरम येथील मंदिर मिरवणुकीदरम्यान अय्यंगारांच्या दोन पंथांमध्ये झालेल्या भांडणाचा आहे. मंदिरातून मूर्ती बाहेर काढली जात असताना भजन गाण्याबाबत झालेल्या वादाची ही घटना असून व्हायरल दावा खोटा आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button