क्राईमताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

बीड जिल्ह्यातील आरटीओ पोलीस झोपेत,एकाच क्रमांकाच्या डझनभर रिक्षा


बीडमध्ये बोगस, खोटे क्रमांक टाकलेले, विनापरवाना अवैध रिक्षा चालवणाऱ्यांना आरटीओ (RTO) स्वप्नील माने यांनी चांगलाच दणका दिलाय.

एकच नंबर असलेले चक्क एक दोन तीन नव्हे तर बारा ऑटोरिक्षा एकाच शहरांमध्ये फिरत असतील तर..विश्वास बसत नाही ना.. पण हे खरे आहे. होय बीडमध्ये (Beed) एकाच क्रमांकाच्या डझनभर रिक्षा फिरत आहेत.

ऑटो क्रमांक एमएच-23,टीआर-311.. मंडळी या क्रमांकाचे ऑटो तुम्हाला बीड शहरातील (Beed City) कोणत्याही रस्त्यावर फिरताना सहज पाहायला मिळतील.. विशेष म्हणजे या एकाच क्रमांकाचे हे एकाच क्रमांकाचे ऑटो उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत ताब्यात घेतले आहेत. धक्कादायक म्हणजे केवळ नऊच नाही या कारवाईमध्ये महानगरात भंगार मध्ये काढलेले असताना देखील काही ऑटोचा बीड शहरात वापर होत असल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, इतक्या सार्‍या ऑटो चा हा एकच क्रमांक कसा काय असतो. तर त्याचं झालं असं या बहाद्दर ऑटोचालक आणि विकत घेतल्यानंतर सुरुवातीला ऑटोवर डीलर कोड लिहला आणि या डीलरने या ऑटोची नोंद परिवहन कार्यालयात केलीच नाही. तर बहाद्दर ऑटो (Auto) चालक देखील परमनंट पासिंग करायला आरटीओकडे गेलेच नाहीत.

आता या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ हे ऑटोचालक दोशी आहेत का? तर असे नाही. जर एका शहरांमध्ये एकाच क्रमांकाची इतक्या मोठ्या प्रमाणात वाहने फिरत होती. तर मग बीड जिल्ह्यातील आरटीओ पोलीस काय करत होते. तुम्हा आम्हाला छोट्या-मोठ्या कारणाने कायम हात दाखवणारे ट्रॅफिक पोलिस इतके दिवस झोपले होते का? असा प्रश्न उपस्थित झाल्यावर प्रादेशिक परिवहन विभागाने या ऑटोची मूळ कागदपत्र तपासून व त्यावरचा दंड वसूल करून हे आटो चालकांना परत देण्यात येतील असे सांगितलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button