महत्वाचेराजकीय

इंडिया आघाडीला आणखी एक जोरका झटका, हा पक्ष भाजपसोबत युती करण्याच्या तयारीत….


लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीला तीन धक्के बसले आहेत. आधी ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला. पंजाबमध्ये देखील आप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे देखील इंडिया आघाडीतून बाहेर पडून एनडीए सोबत सहभागी झाले आहे.

भाजपने आपल्या मित्रपक्षांना पुन्हा आपल्याकडे खेचले आहे. भाजपने आपल्या रणनीतीने मित्रपक्षांना आपल्या गोटात ओढून काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. भाजप आता आणखी एक धक्का देण्याची तयारी केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी जयंत चौधरी यांच्या आरएलडी आणि भाजपमध्ये युती होणार असल्याची माहिती आहे. यामुळे पश्चिम उत्तर प्रदेशात आरएलडीला 4 जागा मिळू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीला आणखी एक झटका लागू शकतो. कारण भाजप एकएक करुन मित्रपक्षांना पुन्हा एकजा जवळ करु लागला आहे.

भाजपने इंडिया आघाडीतील आरएलडीला आपल्या गोटात खेचण्याची योजना आखली आहे. यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते आणि आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी यांच्यातील बोलणी जवळपास निश्चित झाली आहे. जयंत चौधरी दिल्लीत येणार असल्याचं देखील सांगितले जात आहे. त्यानंतर युतीची अधिकृत घोषणा होऊ शकते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button