बीडराजकीय

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचा पराभव का झाला याचा खुलासा करणारी धक्कादायक ऑडिक्लिप


Pankaja Munde : बीड मतदार संघात लोकसभा निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल पहायला मिळाला. भाजप सर्वात चर्चेत असलेल्या उमेदवार पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला.राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांना परभवाची धूळ चारली. तब्बल 32 फे-यांपर्यंत आघाडी पिछाडीच्या हिंदोळ्यावर इथली लढत रंगली होती. अखेर बजरंग सोनवणे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. बजरंग सोनवणे यांनी 6 हजार585 मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, पंकजा मुंडे यांचा पराभव का झाला याचा खुलासा करणारी धक्कादायक ऑडिक्लिप सध्या व्हायरल झाली आहे. या हायरल ऑडिक्लिपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण या क्लीपमुळे ज्या व्यक्तीमुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला त्याचे नाव देखील समोर आले आहे.

पंकजा मुंडे यांच्या विरोधात लढणारे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे उर्फ बाप्पा यांना मदत केल्याची कबुली

बीड लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे उर्फ बाप्पा यांना मदत केल्याची कबुली, शिवसेना शिंदे गटाच्या बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिली आहे. तसंच महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना आपण निवडणूक प्रचारात धोका दिल्याचंही जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी स्वतः मान्य केलंय. त्यांची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. यासंमधीचे झी २४ तास वर वृत्त प्रसारीत करण्यात आलेले आहे

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची महायुतीत गद्दारी केली आणि त्याची थेट कबुली दिल्याचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडिया वरती व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना निवडणुकीत मतांसह पैश्याची मदत केल्याची कबुली, देखील या ऑडिओ क्लिप मध्ये आहे. ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे,मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याची देखील खांडेची भाषा, ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

महायुतीचा धर्म सर्वांनी पाळायला हवा होता. मात्र, अनेकांकडून तो पाळला गेला नाही असं जर काही चुकीचं झालेला असेल तर जी ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे ती धक्कादायक आहे युती धर्म सगळ्यांनी पाळायला हवा होता ऑडिओ क्लिप वायरल होत आहे याची सत्यता तपासून आम्ही ती वरिष्ठांना कळवू वरिष्ठ याच्यावर कारवाई करतील अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button