मनोरंजनव्हिडिओ न्युज

ढोल-ताशांच्या गजरावर हत्तीही नाचला, video : हत्ती मस्त तालात डान्स करत आहे


सध्या एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये, हत्ती मस्त तालात डान्स करत आहे. हत्तीचा हा हटके अंदाज सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

व्हिडिओ पहा !👇👇👇👇



हत्तीला तुम्ही कधी नाचताना पाहिलंय का? सध्या हत्तीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होतोय ज्यामध्ये हत्ती मस्त तालात थिरकत आहे. त्याचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हत्तीच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हत्तीला राजासारखं सजवण्यात आलं आहे. त्याच्या चारही बाजूंना लोकांची गर्दी पहायला मिळत आहे. ढोल ताशांचा गजर सुरु आहे आणि त्या तालावर हत्ती थिरकत आहे. हत्तीचा हा डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

 

@WokePandemic नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 1 मिनिट 3 सेकंदांचा हा व्हिडीओ असून इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहेत. अनेकांना हत्तीचा डान्स पसंतीच उतरला असून त्यांनी त्यांचं भरपूर कौतुक करत कमेंट केल्या आहेत. हा समोर आलेला व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे स्पष्ट झालं नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button