राजकीयव्हिडिओ न्युज

video : भाजपकडून ऑफर, पक्षात आल्यास सोडून देऊ – अरविंद केजरीवाल


दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी बॉम्ब फोडला. भाजपमध्ये प्रवेशाची ऑफर दिली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पक्षात आल्यास सोडून देऊ, असेही केजरीवालांनी म्हटले आहे.

केजरीवालांच्या या दाव्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे. आपमधील आमदारांना फोडण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप आपने केला आहे.

आपच्या (AAP) आमदारांना पैसे देऊन फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आपच्या नेत्या व मंत्री आतिशी यांनी केला आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. आपचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून (BJP) 25-25 कोटी रुपये आणि पुढील निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्वासन भाजपकडून दिल्याचा आरोप त्यांनी केला होता.

व्हिडिओ पहा👇👇👇👇

यापार्श्वभूमीवर बोलताना आज केजरीवाल म्हणाले, त्यांनी कितीही षडयंत्र रचले तरी आम्हाला काही होणार नाही. त्यांच्याविरोधात मी उभा आहे. मीही झुकणार नाही. आम्ही कोणते चुकीचे काम केले आहे. शाळा, रुग्णालय, रस्ते अशी कामे करत आहोत. आम्हाला जेलमध्ये पाठवले तरी दिल्ली सरकारची विकासकामे थांबणार नाही.

मनीष सिसोदियांना तुरुंगात टाकले, कारण त्यांनी शाळा चांगल्या केल्या. सत्तेंद्र जैन यांनी मोहल्ला क्लिनिक सुरू केल्याने त्यांना जेलमध्ये टाकले. त्यांनी ईडी, सीबीआय अशा सर्व केंद्रीय तपास यंत्रणांना आप नेत्यांच्या मागे सोडले आहे, अशी टीका केजरीवालांनी केली.

आम्ही त्यांच्या पक्षात यावे, असे भाजपला वाटत आहे. भाजपमध्ये आला तर आम्ही तुम्हाला सोडून देऊ, असे ते म्हणतात. भाजपमध्ये कधीच येणार नाही, असे मी त्यांना सांगितले. भाजपमध्ये काय जायचे? भाजपमध्ये गेलो तर सर्व गुन्हे माफ, असा टोलाही केजरीवालांनी लगावला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button