व्हिडिओ न्युज

Video दोन तरुणींची दे दणादण हाणामारी, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, अन


मुली एकमेकांशी भयंकर पद्धतीने लढतात. त्यात ते एकमेकांचे केस ओढतात, त्यांना लाथा-बुक्की घालतात, चपलीने मारतात.सध्या सोशल मीडियावर असाच मुलींच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन मुली एकमेंकांशी भांडताना दिसत आहेत. त्या दोघीही कोणापेक्षा कमी कमी नाही, असे दिसत आहे. हा हाणामारीचा व्हायरल व्हिडिओ आता जोरदार चर्चेत आहे. या दोन तरुणींची हाणामारी पाहून तुम्हालाही चांगलाच धक्का बसेल. चला तर नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…

महिलांच्या भांडणाशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ फक्त बघितलेच जात नाहीत तर ते तितकेच शेअर देखील केले जातात. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दोन मुली रस्त्याच्या मधोमध भांडतांना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आधी दोघेही आपापसात वाद घालतात आणि नंतर अचानक दोघांमध्ये हाणामारी सुरू होते. काही वेळातच दोघेही एकमेकांना केसांनी पकडून ओढू लागतात. यावेळी भरपूर लोक इथे जमलेले आहेत. रस्त्यावर उभे असलेले लोकही बघत असतात. मात्र, दोन्ही मुलींचे आपापसात भांडण सुरूच असते.

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या दोन्ही तरुणी खूप दबंग आहेत. दोघेही त्यांच्या भांडणात कोणतीही कसर सोडत नाहीत. मारामारी करताना नंतर अशी परिस्थिती येते की, दोघेही एकमेकांना आडवे करुन, एकमेकांना हाता-पायाने मारत आहेत. व्हिडिओमध्ये लिहिलेल्या कॅप्शननुसार, दोन मुलींमध्ये कोण चांगला डान्स करतो, यावरून वाद झाला होता, असे लक्षात आले.

येथे पाहा व्हिडिओ

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओवर अनेक मजेशीर प्रतिक्रीया देत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button