ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

दारू ,आपले शरीर एका तासात फक्त एक पेय आणि दिवसात एकूण 3 पेये पचवू शकते.


मोठ्या प्रमाणावर आता लोक दारूचे सेवन (Alcohol consumption) करतात. दारू पिणे आरोग्यास अपायकारक असल्याचा इशाराही दारूच्या बाटलीवर लिहिलेला असतो.
तसेच तज्ज्ञांनीही आता दारू न पिण्याचा सल्ला दिला आहे. कारण त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे जनरल मेडिसिन कन्सल्टंट डॉ. रोहन सेकिरा यांच्या मते, आपले शरीर एका तासात फक्त एक पेय आणि दिवसात एकूण 3 पेये पचवू शकते. परंतु, एकापेक्षा जास्त पेय (स्टॅण्डर्ड ड्रिंक) पिणे चुकीचे ठरते. नुकत्याच झालेल्या एका संशोधक अभ्यासात कोणत्या लोकांना अल्कोहोल पिण्याचा धोका जास्त (The risk is high) असू शकतो आणि कोणत्या लोकांना फायदा होऊ शकतो याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. वैद्यकीय जर्नल द लॅन्सेटने हे संशोधन प्रकाशित (Research published) केले आहे.

संशोधन काय सांगते?
मेडिकल जर्नल द लॅन्सेटमधील एका अभ्यासानुसार, 40 वर्षाखालील तरुणांना मद्यपानामुळे आरोग्यास जास्त धोका संभवतो. संशोधकांनी 204 देशांमध्ये 1990 ते 2020 दरम्यान 15-95 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील पुरूष आणि महिलांसाठी 2020 ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज डेटा वापरून अल्कोहोलमुळे 22 दुर्धर आजारांची परिस्थिती उद्भवल्याचे आढळून आले. यामध्ये दुखापत, हृदयरोग आणि कर्करोगाचाही समावेश होतो.

अंशतः फायदा..
या संशोधनात असेही आढळले, की 40 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना अल्कोहोलच्या सेवनाने काही फायदे मिळू शकतात. पण, केव्हा तर.. ते फक्त एक किंवा दोन या प्रमाणात स्‍टँडर्ड ड्रिंक घेत असतील तर. कारण त्यामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि मधुमेहाचा धोकाही कमी होऊ शकतो. एकट्या अल्कोहोलमुळे 2020मध्ये 134 कोटी (1.34 अब्ज)पेक्षा जास्त मृत्यू झाल्याची नोंद आहे, ज्यामध्ये 15 ते 49 वयोगटातील लोक सर्वाधिक होते. जागतिक आरोग्याची हानी कमी करण्यासाठी या वयोगटातील लोकांना दारू न घेण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत, असेही शिफरारस करण्यात आली आहे.

‘दुर्घटनेला अल्कोहोल जबाबदार’
वॉशिंग्टन विद्यापीठातील इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (IHME)च्या प्राध्यापक आणि वरिष्ठ लेखिका इमॅन्युएला गाकिदौ म्हणाल्या, “या वयातील लोकांमध्ये सुमारे 60 टक्के अल्कोहोल-संबंधित दुखापती मोटर अपघात, आत्महत्या आणि हत्या याचमुळे होतात.” असे सांगितले आहे.

अल्कोहोल घेण्याचा दैनिक अंदाज
संशोधकांकडे उपलब्ध डेटावरून, ते दररोज सरासरी अल्कोहोलच्या सेवनाचा अंदाज लावू शकले. मद्यपान न करणाऱ्या व्यक्तीपेक्षा आपल्या आरोग्याला अधिक धोका पत्करण्याआधी एखादी व्यक्ती किती मद्यपान करू शकते याचा अंदाजही या अभ्यासात लावण्यात आला आहे. विश्लेषणात असेही दिसून आले आहे, की 40 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढांसाठी काही प्रमाणात अल्कोहोल पिण्याचे काही फायदे असू शकतात ज्यांची आरोग्य स्थिती नाही. जसे की इस्केमिक हृदयरोग, स्ट्रोक आणि मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. सर्वसाधारणपणे, 2020मध्ये 40-64 वयोगटातील व्यक्तींसाठी सुरक्षित अल्कोहोल सेवन पातळी दररोज साधारण अर्ध्या स्टँडर्ड ड्रिंक्स (पुरुषांसाठी दररोज 0.527 पेये आणि महिलांसाठी 0.562 मानक पेये) पासून सुमारे दोन स्टँडर्ड ड्रिंक (स्त्रियांसाठी) पर्यंत असते. पुरुषांसाठी दररोज 1.69 आणि महिलांसाठी 1.82 स्टँडर्ड ड्रिंक्स प्रमाण आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button