क्राईमबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

ट्रॅव्हल्सची पिकअप टेम्पोला जोराची धडक एक ठार तर 9 जण गंभीर


संत सावता महाराजांची ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला
भाविकांच्या पिकअप टेम्पोला ट्रॅव्हल्सची जोरदार धडक
भीषण अपघातात १ जण जागीच ठार तर ९ जण जखमी



राष्ट्रीय महामार्गावरील हिरापूर जवळील ईटकूर फाट्यावर घडली.

 

बीड : बीड जिल्ह्यात रस्ते अपघाताची मालिका सुरूच आहे. आज पहाटे तीनच्या सुमारास सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्सने पिकअप टेम्पोला जोराची धडक दिली.

या अपघातात (Accident) एक जण जागीच ठार झाला तर 9 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर बीड शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संतश्रेष्ठ सावता महाराज यांच्या श्री क्षेत्र अरण येथून बीड (Beed) जिल्ह्यातील गायकवाड जळगाव (Jalgaon) येथे ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांच्या पीकपला ट्रॅव्हल्सने जोराची धडक दिली. यामध्ये हनुमंत आण्णासाहेब आगरकर (वय 42) यांचा जागीच मृत्यु झाला. तर विश्वंभर देविदास अंतरकर, शैलेस जानकीराम कातखडे, ऋषीकेश परमेश्वर आगरकर, महादेव बबन जावळे, परमेश्वर आस्मान पांगरे, रविराज भाऊसाहेब आगरकर, गजानन बंडु वाघमारे, नंदु भाऊसाहेब आगरकर, बाळु भारत आगरकर हे जखमी झाले आहेत.
घटनेची माहीती कळताच सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी यांनी घटनास्थळी जावून जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. दरम्यान अपघातातील मयत हनुमंत आगरकर यांच्या नातेवाईकांनी मयताचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेत आदर्श घालून दिला.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button