बीड भर रस्त्यावर दगडाने ठेचून भरदिवसा खून

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड : चोरीच्या मोबाइलच्या पैशावरून मित्राने एका तरुणाचा भर रस्त्यावर दगडाने ठेचून भरदिवसा खून केल्याची घटना मंगळवारी (ता.१९) दुपारी शहरातील खंडेश्‍वरी भागात घडली. घटनेनंतर खून करणारा आरोपी तरुण हा घटनास्थळीच थांबून होता. पेठ बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. उत्तरेश्वर ऊर्फ पश्या हौसराव भोसले (वय २५, रा. बोरखेड, ता. बीड, ह. मु. नूर कॉलनी गांधीनगर, बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, दीपक संतोष भोरे (वय १९, रा. खडकपुरा, पेठ बीड) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

उत्तरेश्‍वर ऊर्फ पश्या भोसले हा आपल्या मित्रांसोबत खंडेश्वरी भागात दुपारी गेला होता. त्या ठिकाणी या सर्वांनी नशापान केले. यावेळी चोरीच्या मोबाइलच्या पैशावरून त्यांच्यात वाद सुरू झाले. त्यानंतर दीपक भोरे याने उत्तरेश्‍वर ऊर्फ पश्या

भोसले याच्या डोक्यात दगड घालून त्याला मारहाण केली. यामध्ये तो जागीच ठार झाला. पेठ बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा मारेकरी तरुण दीपक भोरे याला ताब्यात घेतले उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पेठ बीड पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्यात आला