कोरोना आणि इबोलाहून अधिक जीवघेणा विषाणू ,मारबर्ग विषाणूनचा मृत्यूदर तब्बल 88 टक्के जगभरात चिंता

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

घानाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारबर्ग वायरसवर (Marburg Virus) कोणताही इलाज नाही किंवा यावर लसही उपलब्ध नाही. हा इबोला सारखाच किंवा त्याहून अधिक घातक विषाणू आहे. याची लागण झालेल्या व्यक्तीला तीव्र ताप येतो आणि अंतर्गत व बाह्य रक्तस्त्राव होतो. जर संक्रमित व्यक्तीच्या संपर्कामध्ये आला तर तत्काळ स्वत:ला आयसोलेट करा. या विषाणूनचा मृत्यूदर तब्बल 88 टक्के असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.

कोरोना नावाचा विषाणू जगभरामध्ये धुमाकूळ घालत आहे. कोरोनाच्या लाटांवर लाटा धडकत असून यात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढलेले असताना आता कोरोना आणि इबोलाहून अधिक जीवघेणा विषाणू सापडला आहे.

या विषाणूची लागण झालेल्या दोन जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय.

नव्या विषाणूचे नाव मारबर्ग वायरस (Marburg Virus) आहे. पश्चिम आफ्रिकी देश घानामध्ये दोघांना याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या 98 सशयितांना क्वारंटाईन करण्यात आला आहे. मारबर्ग वायरस (Marburg Virus) अत्यंत जीवघेणा असून त्याच्यावर कोणतीही उपचारपद्धती किंवा लस नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

घाणाच्या आरोग्य विभागाने रविवारी मारबर्ग वायरस (Marburg Virus) बाबत माहिती दिली. पश्चिम आफ्रिकी देश घानामध्ये पहिल्यांदाच इबोला पेक्षाही घातक विषाणू सापडला आहे. जुलैच्या सुरुवातीला घानाच्या एशेंटी भागामध्ये राहणाऱ्या दोघांना या विषाणूची लागण झाल्याचा संशय होता. त्यांच्या रक्ताचे नमुने सेनेगल येथील पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आल्यानंतर दोघांनाही मारबर्ग वायरसची (Marburg Virus) लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

जागतिक आरोग्य संघटनेचे घानातील अधिकारी मात्शिदिसो मोएती (Matshidiso Moeti) यांनीही याची दखल घेतली आहे. घानाच्या आरोग्य विभागाने तातडीने कार्यवाही सुरू केली असून संक्रमितांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तत्काळ कारवाईमुळे या विषाणूचा फैलाव रोखण्यास मदत होईल, असे मोएती यांनी सांगितले.