बीडमहत्वाचेमहाराष्ट्र

बीड मठाधिपती धुंडीराज देवीदासबुवा पाटांगणकर यांचे देहावसान


बीड येथील संत जनीजनार्दन यांचे तेरावे वंशज आणि थोरले पाटांगणाचे मठाधिपती धुंडीराज देवीदासबुवा पाटांगणकर यांचे शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता देहावसान झाले.
यावेळी त्यांचे वय 82 वर्षाचे होते. त्यांच्या जाण्याने एक जुन्या पिढीतील ज्ञानवंत आणि धर्मशास्त्रातील आधारवड हरवला आहे. पाटांगणकर महाराज यांच्या पार्थीवावर रविवारी सकाळी शहरातील मोंढा भागातील अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आला



बीड शहरातील पाटांगण गल्लीतील संत जनीजनार्दन संस्थानचे मठाधिपती धुंडीराज देवीदासबुवा पाटांगणकर हे जिल्हा परिषदेचे शिक्षक होते.वयाच्या 55 व्या वर्षी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. 1968 मध्ये संत जनीजनार्दन संस्थानचे मठाधीपती म्हणून संस्थानचे काम पाहू लागले. कीर्तन, प्रवचन, धर्मशास्त्र , पंचांगाच्या माध्यमातून त्यांनी संस्थानचा प्रचार प्रसार करत राज्यभर शिष्य जोडले. वेदावर प्रभुत्व असलेल्या धुंडीराज शास्त्री पाटांगणकर हे आयुर्वेदातील ओषधे देत होते. त्यामुळे त्यांनी बीडमध्ये तळागाळातील सामान्य माणूस आपल्याशी जोडला होता.

बीड शहरात यज्ञ यागाबरोबरच प्रत्येक धार्मिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.थोरल्या पाटांगणावरील चातुर्मास समाप्ती उत्सव ,संत जनीजनार्दन पुण्यतिथी कार्यक्रम ,अन्नदान त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाले. मागील तीन दिवसापासून पाटांगणकर महाराज यांची तब्येत बिघडल्याने त्यांना बीडच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान शनिवारी दुपारी पुढील उपचारासाठी त्यांना औरंगाबाद येथे नेत असताना वाटेतच शहागड जवळ त्यांची प्राणज्योत मालवली. पाटांगणकर महाराज यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन , नातवंडे, दोन मुली, एक भाऊ असा परिवार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button