पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका फोनमुळे राजकीय कारकीर्दीची दिशा बदलली – द्रौपदी मुर्मू

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मी माझे Draupadi Murmu आयुष्य देशासाठी समर्पित केले असून, स्वत:साठी नव्हे तर देशासाठी ही निवडणूक लढवत आहे, असे भावनिक उद्गार भाजपा आणि मित्रपक्षांच्या वतीने राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू Draupadi Murmu यांनी काढले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका फोनमुळे राजकीय कारकीर्दीची दिशा बदलल्याचेही त्यांनी सांगितले.

द्रौपदी मुर्मू Draupadi Murmu यांनी भोपाळमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधताना वरील मत व्यक्त केले. राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवत असण्यामागील रहस्य त्यांनी उघड केले. 21 जून रोजी उमेदवारी जाहीर करण्याच्या 15 मिनिटांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला फोन करून माहिती दिली. आता ज्यांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही ही संधी मिळाली नाही, ते आता खूप आनंदी आणि उत्साहित आहेत. आपल्या समाजातील लोकांना अभिमान वाटावा, यासाठी निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी हे दलितांना मुख्य प्रवाहात आणण्याचा विचार करत आहेत. माझ्या आयुष्यात भारत देश हा देव असून, आयुष्य देशासाठीच समर्पित करत आहे आणि त्यासाठीच हा प्रस्ताव स्वीकारल्याचेही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास उलगडून सांगितला. त्यांच्या निवडीमुळे देशातील सर्वच पक्षांना पाठिंबा देण्यास भाग पडले असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी द्रौपदी मुर्मू Draupadi Murmu यांच्या जीवनातील संघर्षांची माहिती दिली