क्राईमताज्या बातम्यादेश-विदेश

वाहिनीसोबत दीराचे अनैतिक संबध ,अंगावर डिझेल ओतून पत्नीला जिवंत जाळलं


उत्तरप्रदेशच्या बांदा जिल्ह्यात गुरूवारी (14 जुलै) दुपारी घडली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून महिलेने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी संशयित आरोपी वहिनी आणि मृत महिलेच्या पतीला अटक केली आहे. तारादेवी असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मृत तारादेवी हिचा पत्नी सुलेभानचे मोठ्या भावाची पत्नी अनुपमा सोबत अनैतिक संबध होते. सुलेभानच्या मोठ्या भावाचे वर्षभरापूर्वी निधन झाल्याने अनुपमा सुलेभान आणि तारादेवी यांच्यासोबतच राहत होती. मृत ताराबाईने मृत्युपूर्वी दिलेल्या जबाबात म्हटलं आहे की, माझे पती आणि जेठानी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा मला संशय आला होता.
‘गुरूवारी रात्री (14 जुलै) मी पतीला अनुपमा यांच्या खोलीत जाताना बघितले. त्यानंतर मी खिडकीतून डोकावून बघितलं असता, दोघेही मला आक्षेपार्ह स्थितीत दिसून आले. मी आरडाओरड केल्यानंतर दोघांनीही मला पकडलं, मारहाण केली. त्यानंतर अंगावर डिझेल ओतून मला जिवंत जाळलं’. असं तारादेवी हिने मृत्युपूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं आहे.

दरम्यान, मृत तारादेवीच्या जबाबानंतर पोलिसांनी आरोपी पती सुलेभान आणि जेठानी अनुपमा दोघांनाही अटक केली आहे. तसेच ताराबाईचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या थरारक घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button