ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रमुंबईराजकीय

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना ‘राज्यस्तरीय कार्यकारणी’ जाहीर


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला सेनेची “राज्यस्तरीय कार्यकारीणी” अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सरचिटणीस शालिनी ठाकरे आणि रिटा गुप्ता यांनी जाहीर केली आहे. मनसेच्या अनेक महिला कार्यकर्त्या राजसाहेबांवर अनेक वर्षांपासून विश्वास ठेऊन काम करतायेत. अनेक निष्ठावान महिलांची कार्यकारणीत सेना सरचिटणीस आणि उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यात सुप्रिया दळवी, स्नेहल जाधव, सुचीता माने आणि दीपिका पवार यांची महिला सेना महिला सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच बरोबर मुंबई क्षेत्रातील विविध लोकसभा क्षेत्रात महिला सेना महिला उपाध्यक्षा म्हणून ग्रेसी सिंग – दक्षिण मुंबई, ऋजुता परब – दक्षिण मध्य मुंबई, सुप्रिया पवार – उत्तर मुंबई, मीनल तुरडे – उत्तर मध्य मुंबई, सुनीता चुरी – उत्तर पश्चिम, अनिषा माजगावकर – ईशान्य मुंबई, सुजाता शेट्टी – महिला योजना आणि धोरण यांची वर्णी लागली आहे.

महिला सेना मुंबई पुरता मर्यादित न राहता इतर जिल्ह्यातही फोफावली असून याच पाश्वभूमीवर इतर जिल्ह्यातही नेमणुका करण्यात आल्या असून यामध्ये अलका टेकम – यवतमाळ , रेखा नगराळे – लातूर, सोनाली शिंदे- सातारा, वर्षा जगदाळे – बीड, सुजाता ढेरे – नाशिक, दीपिका पेडणेकर – डोंबिवली, चेतना रामचंद्रन – कल्याण पूर्व आणि उर्मिला तांबे – कल्याण पश्चिम यांना महिला सेना महिला “उपाध्यक्षा” म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

ही पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. लवकरच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील सुद्धा मध्यवर्ती कार्यकरणी जाहीर करण्यात येणार आहे. आगामी पालिका निवडणुक तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे महिला चांगलीच तयारीला लागली आहे. महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असलेल्या पालिका निवडणुकीत मनसेच्या विजयात महिला सेना सिंहाचा वाटा उचलेल अशी आशा, मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे आणि रिटा गुप्ता यांनी व्यक्त केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button