क्राईमताज्या बातम्यादेश-विदेश

लग्नात दोन फेरे घेतल्यानंतर नवरी म्हणाली, “फोटोमध्ये नवरदेवाचा रंग गोरा होता पण आता तो काळा दिसतोय.”


मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. नवरीला भेट म्हणून दिलेले लाखो रुपयांचे दागिने परत न केल्याची तक्रार नवरदेवाच्या वडिलांनी पोलिसांत दाखल केली आहे. नवरदेव म्हणाला, “मुलगी आणि तिचे कुटुंब मला भेटायला अनेकदा आले होते आणि त्यांनी अचानक त्यांचा विचार का बदलला हे मला कळत नाही. या घटनेने मला खूप त्रास झाला आहे.”लग्नात वेगवेगळ्या घटना घडतात, यातील काही घटना या खूपच धक्कादायक ठरतात. आता अशीच एक बातमी समोर आली आहे, जी पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
खरं तर, लग्नात दोन फेरे घेतल्यानंतर एका नवरीने नवरदेव खूर काळा आहे असं सांगून लग्नाला नकार दिला. ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आई-वडील आणि नातेवाईकांनीही नवरीला समजावले. पण नवरी काही ऐकायला तयार झाली नाही आणि लग्न मोडले. नवरी म्हणाली की, “फोटोमध्ये नवरदेवाचा रंग गोरा होता पण आता तो काळा दिसतोय.”

उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. इटावा इथल्या भरठाणा येथे नवरी नीता यादव आणि नवरदेव रवी यादव यांचं लग्न होणार होतं. लग्नात दोन फेरे घेतल्यानंतर नीतूने अचानक लग्न मोडत असल्याची घोषणा केली आणि लग्नमंडपात बसलेल्या पाहूण्यांना मोठा धक्का बसला. लग्नासाठी तिला ज्याचा फोटो दाखवण्यात आला तो नवरदेव नसल्याचा आरोप नवरीने केलाय. यानंतर मुलाचे कुटुंबीय नाराज झाले आणि म्हणू लागले की, जर मुलीला मुलगा आवडला नव्हता तर घरच्यांनी लग्नाला होकार का दिला? त्यांनी लग्नाला अगोदरच नकार द्यायला हवा होता, असं मुलाच्या कुटुंबीयांनी सांगितलं. हे प्रकरण वाढल्यावर मुलाच्या कुटुंबियांनी पंचायत बोलावली. यानंतर सुमारे ६ तास पंचायत सुरू राहिली, परंतु मुलीने कोणाचेही ऐकले नाही आणि अखेर नवरी न घेताच वऱ्हाड पुन्हा परतलं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button