क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

बायकोपासून टूरबद्दल लपवून ठेवन पडलं महागात खावी लागली तुरुंगाची हवा


अनेक विवाहित पुरुष हे आपल्या बायकोला घाबरतात हे तर आपण बऱ्याचदा ऐकलं असेल, परंतु तुम्ही याचा खऱ्या आयुष्यावर कसा परिणाम होतो हे पाहिलं आहे का? खरंत एक असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या बायकोपासून सत्य लपवून ठेवण्यासाठी एक मोठी चुक करतो.
ज्याचा परिणाम असा होतो की, ज्याचा त्याने विचार देखील केला नसावा. या व्यक्तीला आपल्या बायकोपासून आपल्या टूरबद्दल लपवून ठेवणं इतकं महाग पडलं की, त्याला आता तुरुंगाची हवा खावी लागत आहे.खरंतर एक तरुण आपल्या मैत्रीणीला भेटण्यासाठी परदेशी गेला होता. परंतु त्याच्या बायकोला त्याच्यावर संशय आला, ज्यामुळे या 32 वर्षीय व्यक्तीने आपल्या पासपोर्टमधील काही पान फाडले. त्यानंतर जेव्हा विमानतळ अधिकाऱ्यांच्या हे लक्षात आले, तेव्हा त्यांनी यावर एक्शन घेतली आणि या व्यक्तीला अटक केली.

अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी काही दिवसांपूर्वी त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी परदेशात गेला होता, पण तो गुरुवारी रात्री भारतात परत आला तेव्हा मुंबई विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांना त्याच्या पासपोर्टची काही पाने सापडली, ज्यावर त्याच्या नवीन प्रवासाशी संबंधित पृष्ठे गायब होती. या पासपोर्टवर व्हिसा स्टॅम्प असायला हवा होता. जो तेथे नव्हता.

पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, ”मी काही कामानिमित्त परदेशात सहलीला जात असल्याचे पत्नीला सांगून मैत्रिणीला भेटण्यासाठी परदेशात गेलो होता. जेव्हा त्याच्या पत्नीला संशय आला आणि त्याने पासपोर्टची पानं फाडली.पासपोर्टशी छेडछाड करणे हा गुन्हा आहे हे त्याला स्पष्टपणे माहीत नव्हतं.”

या व्यक्तीला भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे, ज्यात फसवणूक आणि बनावटगिरीचा समावेश आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button