ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

उपवासाचा फराळ केल्यानंतर उलटी, मळमळ 50 जन रुग्णालयात दाखल झाल्याने एकच खळबळ


बीड : वडवणी तालुक्यातील मौजे कवडगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त जवळपास सर्वच घरात उपवास केला जातो.यासाठी भगर, शाबूदाण्याचा वापर होत असतो. मात्र भगरीमुळे अनेकदा विषबाधेचे प्रकार घडले आहेत. कवडगाव येथे रविवारी 50 ते 60 जणांना उलटी, जुलाबाचा संडास त्रास सुरू झाला.

दुपारी 4 च्या सुमारास वडवणी शहरातील खाजगी व शासकीय रुग्णालयात अनेक रुग्ण दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली. कवडगाव येथील नागरिकांना उपवासाचा फराळ केल्यानंतर उलटी, मळमळ होऊ लागल्याने नागरिकानी तातडीने उपचारार्थ शहरातील खाजगी व शासकीय रुग्णालयात दाखल झाले.

याबाबत खाजगी डाॅ. शंकर वाघ म्हणाले की, कवडगाव येथील नागरिकांना एकाच वेळेस उपवासाच्या फराळातून विषबाधा झाल्याचे दिसत असून उपचार सुरू आहेत. सर्व रूग्ण हे स्थिर आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर निपटे यांनी माहिती मिळताच रूग्णालयात भेट देऊन रुग्णांवर तात्काळ उपचारासाठी प्रयत्न केले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button