व्हिडिओ न्युज

Video : सफाई कर्मचाऱ्याने असे काय केले? व्हिडीओ पहाच !


सोशल मिडियावर जीमचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही वर्कआऊट विषयक माहिती सांगणारे व्हीडिओज असतात, तर काही केवळ शो बाजी करण्यासाठी जीम वर्कआऊटचे व्हिडिओ आणि रील्स सोशल मिडियावर शेयर करत असतात.

मात्र, X वर (पूर्वीच ट्विटर) असा एक हटके व्हिडिओ व्हायरल होत आहे, की तो पाहिल्यानंतर यूजर्स अवाक् होऊन जातात. काय आहे या व्हिडिओमध्ये असे, हे तुम्हीच पहा.

प्रचंड व्हायरल होत आहे हा व्हिडीओ-

अनेक वेळा इंटरनेटवर असे काहीतरी पाहायला मिळते जे अचंबित करणारे असते आणि असे व्हिडीओ (viral video) पाहिल्यानंतर त्यावर विश्वासही बसत नाही. असाच काहीसा प्रकार या व्हिडीओमध्येही पाहायला मिळाला, जो पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक बॉडीबिल्डर आपल्या प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली डेडलिफ्ट करत आहे, तेव्हा तिथे एक सफाई कर्मचारी साफसफाई करण्यासाठी येतो, आणि त्या जागेची सफाई करायला लागतो. आशावेळी जमिनीवर पडलेला रॉड एका हाताने उचलून धरतो, आणि दुसऱ्या हाताने जमीन साफ करतो. साफ केल्यानंतर तो रॉड तिथेच ठेवतो. यानंतर तो त्यांना विचारतो की हा पाठीचा व्यायाम आहे का? त्यावेळी हे दोन्ही बॉडीबिल्डर्स त्याला होकारार्थी उत्तर देतात. यानंतर, तो पुन्हा एका हाताने रॉड उचलतो आणि डेडलिफ्ट करू लागतो. हे पाहून दोन्ही शरीरसौष्ठवपटू अवाक् होतात आणि गोंधळून जातात. तो निघून गेल्यावर, प्रशिक्षक एका हाताने रॉड उचलण्याचा प्रयत्न करतो पण तो रॉड उचलू शकत नाही.

ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर अनेक यूजर्स आपआपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अ व्हीडिओच्या खाली एका यूजरने लिहिले की, याने बॉडीबिल्डर्सची हवाच टाईट केली आहे. त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले की भावा, याचे मला देखील नवल वाटत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 14 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून तो अनेक वेळा शेअर करण्यात आला आहे. सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झालेला हा व्हिडिओ ‘@HasnaZaruriHai’ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button