बीड

बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाचं टोकाचं पाऊल,राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य ..


बिड : मराठा आरक्षणासाठी बीडमधील तरुणाने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं असल्याची धक्कादायक बातमी सध्या समोर येत आहे. शुक्रवार (20 ऑक्टोबर) रोजी या तरुणाने झाडावर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता.



त्यावेळी देखील त्याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला. जगन्नाथ पांडुरंग काळकुटे असं या तरुणाचं नाव आहे. दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं.

जगन्नाथ यांच्या जाण्याने त्याच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. दरम्यान मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

नेमकं काय घडलं?

शनिवार (21 ऑक्टोबर) रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 24 तासांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील झाडावर चढून एका आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सायंकाळी 7 वाजता अर्चना घरी आल्या असता जगन्नाथ काळकुटे यांनी घरात भगव्या गमजाने छताला गळफास लावून घेतला. तर याच तरुणाने दुसऱ्या दिवशी म्हणजे आज राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं. शनिवारी काळकुटे यांच्या पत्नी अर्चना या गावी शेती कामासाठी गेल्या होत्या. सध्या उत्तरीय तपासणीसाठी शिवाजीनगर पोलीसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटूंबियांनी एकच आक्रोश केला.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग

जग्गनाथ पांडुरंग काळकुटे हे कुटुंबासह शेती करत होते. जग्गनाथ काळकुटे यांना निकिता ही अकरावीच्या वर्गात शिक्षण घेणारी मुलगी आणि इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेणारा सार्थक हा मुलगा आहे. ह ते बीड शहरातील गोविंदनगर भागात गेल्या काही वर्षांपासून राहतात. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी होत असलेल्या आंदोलनात ते कायम सहभागी होत होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button