ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

शाहुवाडीतील खोतवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन, दुचाकीस्वारावर घातली झडप


बांबवडे : पिशवी पैकी खोतवाडी ता. शाहुवाडी येथील घाट परिसरात बिबट्याच्या दर्शनाने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्री कोल्हापूरहुन खिंडीमार्गे प्रवास करणाऱ्या लोकांना बिबट्या दिसला. गाडीच्या प्रकाशामुळे गाडीच्या दिशेला झेप घेण्याचा प्रयत्न करत असल्याने लोकांमध्ये मोठी भिती पसरली आहे.



कोल्हापूरला असलेले कामगार रात्री आठच्या दरम्यान घरी येत असताना त्यांना या बिबट्याचे दर्शन झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या मार्गावर प्रवास करणाऱ्या अन्य लोकांना त्याच ठिकाणी बिबट्या दिसला. सलग दोन दिवस बिबट्याचे दर्शन लोकांना घडत आहे. शनिवारी संध्याकाळी याचदरम्यान बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे या मार्गावर या मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांच्यात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी लोकांकडून होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button