ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे मेट्रोचा महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त हुकणार


पुणे:वनाज, आनंदनगर, नळस्टॉप, गरवारे कॉलेज या मेट्रो स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून काम करण्यात आले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधिशांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांची समिती नेमून संपूर्ण मेट्रो मार्गाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी जनहित याचिका दाखल होती.
त्यावर निर्णय देताना न्यायालयाने पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले.



असे आहेत विस्तारित मार्ग

फुगेवाडी-शिवाजीनगर न्यायालय मार्गाचे अंतर ८ किलोमीटर आहे. या मार्गावर बोपोडी, दापोडी, शिवाजीनगर, शिवाजीनगर न्यायालय अशी स्थानके आहे.
गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल रुग्णालय हे अंतर ७ किलोमीटर आहे. या मार्गावर डेक्कन, संभाजी उद्यान, महापालिका भवन, मंगळवार पेठ (आरटीओ), पुणे रेल्वे स्टेशन आणि रूबी हॉल रुग्णालय हे स्थानके आहेत.
का लागणार उशीर

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महामेट्रोने दोन्ही विस्तारित मार्ग एक मेपर्यंत सुरू होऊ शकतील, असे या पूर्वी म्हटले होते. परंतु, कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टीकडून पिंपरी-शिवाजीनगर न्यायालय मेट्रो मार्गाची पाहणी येत्या मंगळवारी (दि २ मे) होणार आहे. त्या पाहणीसाठी ५-६ दिवस लागतील. ही तपासणी झाल्यानंतर गरवारे कॉलेज-रूबी हॉल रुग्णालय मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळेल.

दोन्ही मार्गांच्या मेट्रोच्या कामाची पाहणी झाल्यावर ते प्रवासी वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र महामेट्रोला मिळेल. त्याची माहिती महामेट्रोकडून राज्य सरकारला कळविण्यात येईल. त्यांच्याकडून मंजुरी आल्यावर उद्‍घाटनाची तारीख निश्चित होईल. त्यानंतर प्रवासी वाहतुकीला मुहूर्त मिळणार आहे. आता जूनमध्ये याचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे. वनाज- गरवारे महाविद्यालय मेट्रो मार्गाचे आणि त्यावरील चार स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी सहा मार्च रोजी उद्घाटन झाले होतेय

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button