क्राईमताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

परळीतील दर्ग्याच्या इनामी जमीन भु माफिया च्या घशात घालणाऱ्या मुख्याधिकारी , दुय्यय निबंधक ,तहसीलदार यांच्यावर कडक कार्यवाही करा


परळीतील दर्ग्याच्या इनामी जमीन भु माफिया च्या घशात घालणाऱ्या मुख्याधिकारी , दुय्यय निबंधक ,तहसीलदार यांच्यावर कडक कार्यवाही करा



सय्यद सलीम बापू यांच्या नेतृत्वाखाली परळी नगर परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू

परळी दि १७ (प्रतिनिधी) :- परळी येथील देवस्थान च्या जमीनी सिटी सर्वेच्या नावाखाली बोगस पी.टी.आर. च्या बऱ्याच प्रमाणात फेरफार झालेले आहे. सदरील झालेल्या बेकायदेशीर ते वादग्रस्त फेर तात्काळ रद्द करुन मालकी रकान्यामध्ये देवस्थानचे नाव घेण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आज सकाळपासून सय्यद सलीम बापू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.
असे की परळी येथील देवस्थान च्या जमीनी सिटी सर्वेच्या नावाखाली बोगस पी.टी.आर. च्या बऱ्याच प्रमाणात फेरफार झालेले आहे. सदरील झालेल्या बेकायदेशीर ते वादग्रस्त फेर तात्काळ रद्द करुन मालकी रकान्यामध्ये देवस्थानचे नाव घेण्यात यावे व या प्रकरणी जिममेदर असलेले न प परळीचे मुख्याधिकारी ,दुय्यय निबंधक ,तहसीलदार व या कामी मदत करणारे सर्व अधिकारी यांच्यावर तात्काळ व कठोर कार्यवाही करून त्या जमिनी देवस्थान परत देवस्थान देण्यात याव्या अशी मागणी माजलगाव येथील माजी नगर सेवक तथा सामाजिक कार्यकर्ते सलीम बापू यांनी केली आहे
या विषयी सविस्तर वृत्त असे की , परळी शहरामधील दर्गा नासरजंग ची इनामी जमीन सर्व्हे नंबर ३६, ३७, ३८, ४१, ४२, ३६/१, ३६ / ३ या जमीनीवर बेकायदेशीर सी.टी.सर्व्हे करून पी.टी.आर. वर इतर लोकांची नांवे नोंद घेण्यात आलेली आहे.
त्याच प्रमाणे ७/१२ वर देखील बोगस कागदपत्र तयार करुन भूमाफीयांशी संगणमत . करुन आपल्या मर्जीतील लोकांची नांवे नोंदविण्यात आली. भूमाफियांनी आपल्या बाळाच्या व राजकीय जोरावर अधिकारी लोकांना हाताशी धरून शासनाची व देवस्थानाची फसवणूक केलेली आहे. भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक, मुख्याधिकारी नगर परिषद, व परळी तहसील कार्यालयाचे अधिकारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करुन शासन जी. आर. प्रमाणे सर्व फेरफार तात्काळ रद्द करुन मालकी रकान्यामध्ये दर्गा नासरजंग अशी नोंद घेण्यात यावी.
त्या चप्रमाणे भूमिअभिलेख कार्यालयाने जो मोठा गोंधळ निर्माण केलेले आहे त्याची सुध्दा चौकशी करण्यात यावी तसेच भूमिअभिलेख कार्यालया कडून जे बोगस पी एम कार्ड देण्यात आले याची ही कसून चौकशी करावी या साठी आम्ही आज दि. १७ एप्रिल सकाळी १० वाजल्यापासून नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करत आहोत. उपोषणात कादर कुरेशी,अकबर शेख,शेख सिकंदर, एड. अल्ताफ शेख,शेख मेहमूद,शेख बाबा,मेहबूब भाई सहल इतर सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनावर राहील असे ही सलिम बापू यांनी मुख्याधिकारी नगर पालिका परळी वैधनाथ यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. सदरील निवेदनाची प्रतिलिपी महसूलमंत्री ,विभाग आयुक्त ,जिल्हाधिकारी आदींना ही पोच केल्या आहेत


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button