प्रेयसीच्या घरी जाऊन पतीला मारहाण,पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


रक्षकच भक्षक बनल्याचे प्रकार पुण्यात उडकीस आला आहे. पोलीस उपनिरीक्षकाने अनैतिक संबंध प्रस्थापित करून प्रेयसीच्या पतीलाच मारहाण करून पिस्तूल रोखत जिवे मारण्याची धमकी दिली.

पुणे: पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. मात्र, शहरात दिवसेंदिवस गुन्ह्याचे प्रमाण वाढतच आहेत. आता तर, थेट पोलीस अधिकाऱ्यानेच पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल, असे कृत्य केले आहे. पत्नीसोबतचे अनैतिक संबध सोडून दे म्हणून सांगणाऱ्या, पतीला पोलिस उपनिरीक्षकाने मारहाण करून पिस्तूल रोखल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील शास्त्रीनगर कोथरूड भागात पोलीस उपनिरीक्षकाने प्रेयसीच्या घरात जाऊन तिच्या नवऱ्याला मारहाण केली. पिस्तुल रोखत जीवे मारण्याचीधमकी दिली आहे. प्रवीण नागेश जर्दे असे घरात घुसून पतीला मारहाण करणाऱ्या आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. आरोपी प्रवीण जर्दे हा पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयातील कोर्टावर या ठिकाणी सध्या नियुक्तीला आहे. काही वर्षांपूर्वी त्याची नियुक्ती कोथरूड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या शास्त्रीनगर पोलीस चौकी या ठिकाणी होती. त्यावेळी मच्छिंद्र बबन हवले यांची पत्नीबरोबर सामाजिक सेवा करण्याच्या नावाखाली आरोपी जर्दे आणि तिचे सुत जुळवून तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले होते.

पत्नी सोबतचे अनैतिक संबंध सोडून देण्याच्या कारणावरून तक्रारदार मच्छिंद्र हवले यांनी आरोपी प्रवीण जर्दे याला सांगितले. त्यावर संतापलेल्या आरोपीने घरात घुसून पतीला मारहाण करत पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकी दिली आहे .कायद्याचा रक्षक असलेला आरोपी पोलीस उपनिरीक्षक जर्देच्या या महाप्रतापाने शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अन्याय झाल्यानंतर नागरिकांनी तक्रार घेऊन जायचे असते तिथेच असा प्रकार घडला आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्याची पोलिसांवर जबाबदारी नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी संरक्षण करण्याची जबाबदारी पोलीस विभागावर आहे. त्याच पोलीस विभागातील अधिकारी समाजातील नागरिकांना त्रास देत असेल, तर काय होणार? अशी नागिरक चिंता व्यक्त करत आहेत.