देशात रुग्णवाढ सुरूच, दिवसभरात 11 जणांचा मृत्यू..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


कोरोना रुग्णवाढ सुरूच असून दिवसभरात पुन्हा सहा हजारांवर रुग्णनोंद झाली आहे. दिवसात 6155 रुग्ण नवे कोरोनाबाधित आढळले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमुळे सक्रिय रुग्णांची संख्या 31 हजार 194 वर पोहोचली आहे.

चाचण्यांच्या प्रमाणात बाधित आढळण्याचे प्रमाण वाढून 5.63 टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशात वाढत असलेल्या रुग्णांमध्ये कोरोना व्हेरिएंट ‘एक्सबीबी-1.16’चे प्रमाण सर्वाधिक असल्याचे जिनोम सिक्वेंसिंगचे निरीक्षण करणारी कमिटी ‘इन्साकॉग’ने म्हटले आहे. सध्या आढळणाऱ्या रुग्णांमध्ये तब्बल 38.2 टक्के रुग्ण ‘एक्सबीबी-1.16’ व्हेरिएंटचे असल्याचे कमिटीने स्पष्ट केले आहे. हा व्हेरिएंट ‘एक्सबीबी-1’ पेक्षा 1.27 पट वेगाने वाढतो, असे कमिटीने स्पष्ट केले आहे.

राज्यात रेकॉर्डब्रेक, 926 बाधित
महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढतच असून गेल्या 24 तासांत 929 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या वर्षात राज्यात इतक्या मोठय़ा संख्येने रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत दुसऱ्या दिवशी दोनशेपार
मुंबईतही रुग्णवाढ सुरू असून गेल्या 24 तासांत करण्यात आलेल्या 1432 चाचण्यांमध्ये 207 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर एकाच दिवसांत 189 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईत सध्या 1385 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत आढळलेल्या रुग्णांमधील 14 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील 7 जणांना ऑक्सिजनची गरज लागली.

दिवसभरात…देश 6155,राज्य 926,मुंबई 207