महात्मा फुले जयंतीदिनी राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश धरणे आंदोलन – गौतम कांबळे

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


महात्मा फुले जयंतीदिनी राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश धरणे आंदोलन – गौतम कांबळे

महाराष्ट्र : महात्मा फुले जयंती दिनी मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश धरणे आंदोलन करण्यात येणार आहे .
याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना महाराष्ट्र राज्य आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य निमंत्रक व महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की ,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी 7 मे 2021 चा शासन निर्णय रद्द करून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीतील आरक्षण पूर्ववत सुरू करावे .अवघड क्षेत्रातील जागा भरण्यासाठी राबविण्यात येणारा प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रियेतील सहावा राऊंड रद्द अथवा स्थगित करण्यात यावा . 1 नोव्हेंबर 2005 व त्यानंतर शासकीय सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना विना अट तात्काळ मंजूर करण्यात यावी . 14 मार्च 2023 रोजी सरकारी नोकरीतील खाजगीकरणाचा काढलेला शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा .विद्यार्थीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात यावी तसेच शासकीय वस्तीगृहातील सोयी सुविधा वाढविण्यात याव्यात . पदवीधर शिक्षकांप्रमाणे शैक्षणिक अहर्ता धारण करणाऱ्या उपशिक्षकांनाही केंद्रप्रमुखपदी संधी द्यावी .खाजगीकरणाचा ज्यात आरक्षणाचा समावेश नाही असा 14 मार्च 2023 चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा .नवीन संसद भवनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे .विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व फ्री शिप देण्यात यावी .मागासवर्गीयांवरील अन्याय अत्याचार थांबवण्यात यावे .इत्यादी 20 प्रश्नांसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश धरणे आंदोलन करण्यात येणार आहे .तसेच ठाणे , पालघर ,नवी मुंबई व बृहन्मुंबई या ४ जिल्ह्यांचे आक्रोश धरणे आंदोलन आझाद मैदानावर करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आरक्षण हक्क कृती समितिचे राज्य निमंत्रक गौतम कांबळे यांनी दिली .