क्राईमताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

मुंढव्यात अनधिकृत गौणखनिज उत्खन वाहतूक प्रकरणी गुलमोहर बिल्डरला दंडाचा दणका


मुंढव्यात अनधिकृत गौणखनिज उत्खन वाहतूक प्रकरणी गुलमोहर बिल्डरला दंडाचा दणका“केशवनगर मधील बिल्डर पुनीत राजकुमार बेहेर यांना र.रु.१,१४,५१०/- दंड भरण्याचे तहसिलदारांचे आदेश”

पुणे : अनधिकृत गौणखनिजाची वाहतुक करतांना हाय्वा वाहन क्रमांक MH १२ RN ५३३५ मुंढवा येथे पकडणेत येऊन पुणे शहर तहसिलदार राधिका हावळ-बारटक्के यांनी दंडात्मक कारवाई केली आहे.

सदर प्रकरणी तहसिलदार पुणे शहर यांचे तोंडी आदेशान्वये गाव कामगार तलाठी आशिष पवार व कोतवाल सापळे यांनी कागदपत्रांची तपासणी केली असता संपूर्ण गौणखनिजणे भरलेली हाय्वा वाहन क्रमांक एम एच १२ आर एन ५३३५ वरील वाहनचालकाकडे गौणखनिज वाहतूक पास नसल्याचे आढळून आले, त्याने हायवा वाणामध्ये ज्यादा भरलेल्या २ ब्रास चा पंचनामा करून सदर माल व्हातुक वाहन मुंढवा पोलीस स्टेशन आवारात लाऊन अहवाल पुणे शहर तहसिलदार यांच्याकडे सादर केल्या त्यान्वये सदर रॉयल्टी व दंडाची पाचपट रक्कम आकारण्यात आली आहे.

तपशील व रक्कम

चालु बाजारभाव प्रमाणे तपशील व दंडाची रक्कम, ५ पट र.रु ६६५५/- त्याप्रमाणे २ ब्रास ला रक्कम १३३१०/-, दगड/माती/ मुरूम वाहतुक केलेल्या गौणखनिजाची रॉयल्टीप्रती ब्रास र.रु.६००/- ला १२००/-, ट्रक वाहतुक प्रकार दंड १,००,०००/-, एकूण रॉयल्टी व दंड रक्कम रुपये १,१४,५१०/-
“वाहतूक परवान्यावरील मंजूर परीमानापेक्षा ट्रक मालकाने २ ब्रास मुरूम अनाधिकृत गौणखनिज वाहतुक केलेने गौणखनिजाची रॉयल्टी व दंडाची रक्कम रुपये १,१४,५१०/- (अक्षरी एक लाख चौदा हजार पाचशे दहा रक्कम रुपये फक्त) लेखाशीर्ष ०८५३ या लेखाशीर्षा खालीचलनाने (ग्रास प्रणाली) सरकार जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

सदरची रक्कम सात दिवसाचे आत भरणा करावयाची असून रक्कम भरणा न केलेस सदरची रक्कम जमीन महसुलाची थकबाकी समजून जप्त केलेल्या वाहनाचा लिलाव करून वसूल करणेत येईल असा लेखी आदेश पुणे शहर तहसिलदार राधिका हावळ-बारटक्के तहसिलदार, पुणे शहर यांनी केशवनगर (मुंढवा) येथील गुलमोहर बिल्डर पुनीत राजकुमार बेहेर यांना दिला आहे.

“मुंढवा-केशवनगर भागासाठी तहसिलदार पुणे शहर व खनिकर्म जिल्हाधिकारी पुणे कार्यालयातून उत्खननाचे परवाने दिले जातात परंतु नवीन कोरेगाव पार्क मंत्रा मुंढवा हद्द व केशवनगर मध्ये गौण खनिज उत्खननापेक्षा अधिकचे व बेकायदेशीरपणे उत्खनन करून रॉयल्टी बुडवली जाते असे प्रकार सर्रास सुरू आहेत, मात्र जागृत नागरिकांकडून तक्रारी केल्याच्या नंतर तलाठी तहसीलदार महसूल कडून संबंधित अधिकाऱ्यांकडून तोडपाणी केली जाते, सदर प्रकरण निस्तानदीत करण्यात येतात! असे नागरिकांमध्ये चर्चेचा पीक उठलेला आहे, केशवनगर मुंढवा भागामध्ये दररोज बेकायदेशीरपणे हजारों ब्रास गोणखणीज उत्खननाचे व विल्हेवाट लावण्याचे सर्रास प्रकाश सुरू आहेत. परंतु परवान्यापेक्षा अधिकचे गौणखनिजाचे उत्खनन करणाऱ्या बांधकाम व वाहतूक व्यावसायिकांवर अनधिकृत उत्खनन व गौण खनिज वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांवर तहसिलदार, जिल्हाधिकारी खनिकर्म पुणे यांच्याकडून नियमित कार्यवाही का होत नाही? असा प्रश्न भागातील नागरिक कंकडून केला जात आहे? कारवाई केली तर केवळ दिखावा केला जातो.? परवा तहसीलदार यांच्या तोंडी सूचनेवरून तलाठी यांनी पकडलेले वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिकचे 6ते8 बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहन हायवा डंपर २ ब्रासच कसा.?? परवान्याप्रमाणे विहित मुदतीत उत्खनन केलेले आहे का? परवान्यापेक्षा जास्तीचे गौणखनिज उत्खननचा अहवाल


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button