के.पी.पॅरामेडीकल इन्स्टिट्यूट मधे आर्थिक गैरव्यवहार विध्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात-प्रसाद कोद्रे,सचिव

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


के.पी.पॅरामेडीकल इन्स्टिट्यूट मधे आर्थिक गैरव्यवहार
विध्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात-प्रसाद कोद्रे,सचिव.

हडपसर पी.एम.पी.एल बस थांबा गाडीतळ येथील, के.पी प्यारा मेडिकल संथेने विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी घेऊन, संस्थेचे विध्यमान अध्यक्ष कृपाल पलुसकर यांनी तो पैसा स्वतःच्या ऐशो आरामासाठी संस्थेचे करोडो रुपये उधळले असल्याचा आरोप संस्थेचे सचिव प्रसाद कोद्रे यांनी केला आहे.
संस्था अध्यक्ष कृपाल पलुसकर यांनी विद्यार्थ्यांकडून नियम बाह्य प्रवेश शुल्क घेऊन इतर खात्यात वर्ग करून स्वतःच्या
परिवाराच्या गरजा जसे गाडी, बंगला, मालमत्ता व इतर सुख सोयीं करीता केले असल्याचा आरोप संस्था चालक कोद्रे यांनी केला आहे.
निसर्ग बहु उद्देशीय सेवा भावी संस्थेचे के.पी.पॅरामेडीकल इन्स्टिट्यूट गाडीतळ हडपसर, पिंपरी, बालाजीनगर या ठिकाणी कार्यरत आहेत.

संस्थेचे इतर संचालक काही कारणास्तव व्यस्त असल्याने विध्यमान अध्यक्ष कृपाल पलुसकर यांनी निसर्ग बहु उद्देशीय सेवा भावी संस्थेचे माहिती दर्शविणारे फलक हटऊन नवीन संस्था म्हणजे डॉ. के. टी. पलुसकर चॅरीटेबल ट्रस्ट या संस्थेचे फलक लावून कुलपेही बदलण्यात आली व इतर संस्थाचालक संचालकांना संस्थेत येण्यास मनाई करण्यात आली.
तसेच सरकारी मान्यता निसर्ग बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेची असून विद्यार्थ्यांकडून नियम बाह्य भरमसाठ प्रवेश शुल्क मात्र
डॉ.के.टी.पलुसकर चॅरीटेबल ट्रस्ट या खात्यावर घेऊन मोठा गैरव्यवहार करीत आहे.
या मनमानी कारभाराबद्दल संस्थांचे संचालक इन्स्टिट्यूट मध्ये गेले असता तेथील कर्मचाऱ्यांनी उद्धटपणे जाब विचारला.
हडपसर येथील आजच्या के.पी.पॅरामेडीकल इन्स्टिट्यूट मध्ये अनेक आर्थिक गैरव्यवहार होत असल्याने या संदर्भात धर्मादाय आयुक्त यांच्याकडे दाद मागितली असून न्यायालयातही प्रकरण दाखल केले असल्याची माहिती प्रसाद कोद्रे यांनी दिली.
सदर कारभाराचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना कामगारांनी शूटिंग करण्यास मनाई केली आणि अरेरावी केली.
संस्थेच्या अनागोंदी कारभाराबाबत अध्यक्ष कृपाल पलुसकर यांच्याशी मोबाईल वर संपर्क साधला असता पुण्यात आल्यावर समक्ष बोलु असे सांगितले.
“हजारो पालक आपला मुलगा-मुलगी शिकून नोकरी मिळून आपला व स्वताचा उदर निर्वाह नोकरी करून आपले आयुष्य चांगले जगेल या करिता संस्थेत प्रवेश घेतात.
संस्थेचे अध्यक्ष मनमानी फी आकारून आर्थिक लुट करीत असून या मुला-मुलीना कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणत्या संस्थेचे प्रशस्तीपत्र देणार व संस्थेच्या अशा कारभारामुळे विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे काय? असा प्रश्न निर्माण झाल्याचे कोद्रे यांनी  सांगितले