तरुणीचे हात बांधून तिच्या तोंडावर गांजाचा धूर सोडून बलात्कार
पुणे : (आशोक कुंभार ) दुसर्या मुलीसोबत अफेअर असल्याच्या संशयावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणीचे हात बांधून तिच्या तोंडावर गांजाचा धूर सोडून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी एका २२ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३०४/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी श्रवण राजेंद्र अंकुशे (रा. उंड्री) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आरोपीच्या घरी १७ मार्च रोजी घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते.
आरोपीचे दुसर्या मुलीसोबत अफेअर आहे, असा फिर्यादीला संशय आल्याने त्यांच्यात यापूर्वी भांडणे झाली होती.
फिर्यादी या आरोपीच्या घरी गेल्या असताना त्यावरुन त्यांच्यात वाद झाला.
तेव्हा श्रवण याने घराचा दरवाजा लावून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.
त्याला तिने नकार दिल्यावर त्याने फिर्यादीचे हात कपड्याने बांधले.
गांजा ओढून त्याचा धूर त्याने तोंडाने फिर्यादीचे नाकात सोडला. तसेच तिला लाथाबुक्यांनी मारहाण केली. नाका, तोंडात गांजाचा धूर गेल्याने फिर्यादी यांना गुंगी आली. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. सहायक पोलीस निरीक्षक तोरगल तपास करीत आहेत.