नोटा मोजता मोजता प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना फुटला घाम

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


देशभरात प्राप्तीकराचे विभागाचे धाडसत्र सुरू आहे. विविध प्रकरणातील संशयितांकडे छापामार कारवाई होत आहे. अशाच एका कारवाईदरम्यान प्राप्त रोख रक्कम मोजता मोजता प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना घाम फुटला.

मोठ्या प्रमाणात असलेली रोख रक्कम लक्षात घेत नोटा मोजणारी मशिन बोलवावी लागली. गेल्या काही दिवसांतील ही सर्वात मोठी छापामार कारवाई मानली जात आहे.

हरियाणातील नूंह जिल्ह्यातील वार्ड नंबर ६ मध्ये आयकर विभागाने जनावरांचे व्यापारी उमर मोहम्मद पुत्र आसमोहम्मदच्या घरावर सकाळी ७ वाजता छापा मारण्यात आला. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. आयकर विभागाच्या ८ सदस्यांच्या टीमसह सीआरपीएफ जवानांची एक तुकडीही घटनास्थळी होती. गेल्या अनेक वर्षापासून उमर मोहम्मद हे जनावरांचा व्यापार करतात. त्यांच्याविरोधात कर चोरीचा आरोप झाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली. नूंह जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई करण्यात आली. या पथकाचे नेतृत्व पुष्पेंद्र पूनिया यांनी केले. व्यापारी उमर मोहम्मद मेवात जिल्ह्यासह सर्व मीट फॅक्टरी, उत्तर प्रदेशातील अलीगडसह अन्यठिकाणी जनावारांचा व्यवसाय करतात. गुप्तचर खात्याकडून काही संशयास्पद आर्थिक व्यवहारांबाबत कारवाईचे संकेत देण्यात आले होते.

प्रमाणात रोकड, दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त
सोमवारी छापेमारीची पूर्ण तयारी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी उमर मोहम्मद यांच्या घरी धाड टाकली. त्यावेळी शहरात खळबळ माजली. मोहम्मद यांच्या घरी इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडली ही रोकड मोजण्यासाठी मशिन आणावी लागली. या छापेमारीची शहरात जोरदार चर्चा सुरू होती. जनावरांच्या व्यापारी असलेल्या मोहम्मद यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड, दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे सापडली. मोहम्मद यांच्या खात्यातूनही कोट्यवधीची उलाढाल झाली होती.