पुणे : ( आशोक कुंभार ) पुणे शिवाजी नगर काँग्रेस भवन येथे महत्त्व पूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महिलांना घरेलू रोजगार निर्मिती आणि उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्याचे मार्गदर्शन पुणे जिल्हा महिला अध्यक्षा पूनम सावंत यांनी मार्गदर्शन केले. या साठी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री सुनील शिंदे साहेब यांनी मदत करण्याचे आवाहन केले. महिला सक्षमीकरण आणि महिलांना घरेलू रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महत्व पूर्ण बैठक पार पडली. कार्यक्रम साठी पुणे जिल्हा महिला अध्यक्षा पूनम सावंत हडपसर तालुका अध्यक्ष राजश्री ताई पुणे जिल्हा सोशल मिडिया अध्यक्ष श्री नामदेव जाधव साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी संघटना अध्यक्ष श्री सुनील जी शिंदे साहेब उपस्थित होते.