राजेंद्रजी जगतापसाहेब यांचा वाढदिवस साजरा

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

जेजुरी : (आशोक कुंभार )श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड, संचलित जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल जेजुरी येथे आज मंगळवार दिनांक १४ मार्च २०२३ रोजी विद्यालयामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कॅन्टोन्मेंट बोर्ड (महू) इंदोर,मध्य प्रदेश मा. डॉ. श्री राजेंद्रजी जगतापसाहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला .या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेच्या शिक्षिका निलोफर इनामदार मॅडम यांनी सरांनी आत्तापर्यंत केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर आधारित माहिती देऊन त्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले व विद्यार्थ्यांना त्यांच्या यशस्वी वाटचालीची प्रेरणा देण्यात आली.शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता कपूर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी सरांच्या वाढदिवसानिमित्त भावी आयुष्याबद्दल व यशस्वी वाटचालीस परमेश्वराकडे प्रार्थना करून शुभेच्छा दिल्या . तसेच सरांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयामध्ये चिंच , वड व गुलमोहर अशा रोपांची लागवड करून वृक्षारोपण हा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला.