बदला घेण्यासाठी केला प्रेमविवाह

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

पिपरी : (अशोक कुंभार )  बदला घेण्यासाठी तुझ्याशी लग्न केले, असे म्हणत पतीने आपल्या पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. पत्नीच्या छळात पतीला त्याचा भाऊ, आई-वडील यांनी देखील साथ दिली

ही घटना २९ एप्रिल २०१२ ते एप्रिल २०२२ या कालावधील चेन्नई, अमेरिका, हिंजवडी, माण येथे घडली. या प्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात मंगळवार (दि.२३) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पीडित महिलेचा पती, सासू-साससे आणि दोन दीर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही मराठी असून ती साॅफ्टवेअर इंजिनिअर आहे. तिचा पती देखील स्वॉफ्टवेअर इंजिनिअर असून तो दक्षिण भारतीय आहे. त्यांनी प्रेमविवाह केला आहे. आरोपी पती याने फिर्यादीला मारहाण करत तुझा छळ करायचा होता, तुझ्याकडून बदला घ्यायचा होता म्हणून मी लग्न केले असे धमकावले. तसेच फिर्यादीला पतीची भाषा आणि रिती येत नसल्याने तिला टोमणे मारून अपमानित केले. तसेच तिला घरातून इतर आरोपींनी बाहेर काढत शारिरीक व मानसिक छळ केला, असे फिर्यादीत नमूद आहे.