ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्तव्यावर असतांना हृदयविकाराच्या झटक्याने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू


भुसावळ: शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.सागर दिलीप देहाडे असे मयत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मयत सागर हा अवघ्या 32 वर्षाचा होता. सागर हा नेहमी प्रमाणे सकाळी पोलिस ठाण्यात आला. हजेरी मस्टरवर एन्ट्री करुन समंस बजावणीसाठी निघाला. तितक्यात छातीत दुखू लागल्याने जागीच बसला. त्याला तातडीने ट्रामा केअर सेंन्टरला दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने गोदावरी हॉस्पिटल येथे नेत असतांना रस्त्यात त्यांची प्राणज्योत मालविली. मयत सागर याच्या पश्चात गरोदर पत्नी, मुलगा असा परीवार आहे. दरम्यान, कामाचा अधिक ताण आणि जेवण वेळेवर नाही आणि अपुर्ण झोप यामुळे अशा घटना घडत असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. जळगाव येथे मुळ घरी नेण्यात येवून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button