क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

युवतीची छेड काढणे वृद्धाला पडले महागात


बुलढाणा : (अशोक कुंभार )बसमध्ये बाजूला बसलेल्या वृद्ध प्रवाशाने छेड काढली. मात्र, न डगमगता तिने मध्येच खाली उतरलेल्या ‘त्याचा’ पाठलाग करत भावाच्या मदतीने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेबुलढाणा पोलिसांनी या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, या धाडसी युवतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.बुलढाणा येथील रहिवासी असलेली २० वर्षीय युवती चिखली येथील महाविद्यालयात शिकत आहे. ती बसने बुलढाण्याकडे परत येत होती. यावेळी तिच्या बाजूला बसलेल्या समाधान परशराम सुरगडे (वय ६३, राहणार विदर्भ हाउसिंग सोसायटी, बुलढाणा) याने तिची छेड काढली. युवतीने आपल्या भावाला फोन करून घटनेची माहिती दिली. यामुळे घाबरलेला वृद्ध बुलढाणा बस स्थानकऐवजी मध्येच चांडक ले आउट थांब्यावर उतरला. युवतीही खाली उतरली व त्याचा पाठलाग केला. याचवेळी तिचा भाऊ व इतर नातेवाईक त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी सुरगडे याला बुलढाणा शहर ठाण्यात आणले. युवतीच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button