ताज्या बातम्या

दिग्गज क्रिकेटपटू वर्ल्ड कपसाठी निवृत्ती मागे घेणार, वर्ल्ड कपसाठी भारतात येणार!


मुंबई : भारतामध्ये होणारा वनडे वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, त्यासाठी सगळ्याच टीमनी जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. 2019 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवलेली इंग्लंडची टीम खिताब वाचवण्यासाठी मैदानात उतरेल.2019 वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडच्या विजयाचा हिरो राहिलेला बेन स्टोक्स निवृत्ती मागे घेण्यासाठी तयार झाला आहे. जुलै 2022 मध्ये स्टोक्सने वर्कलोड मॅनेजमेंटचं कारण देत वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार बेन स्टोक्स भारतामध्ये यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपसाठी निवृत्ती मागे घ्यायला तयार झाला आहे. टीमचा कर्णधार जॉस बटलरने जर आपल्याला वर्ल्ड कप खेळायचा आग्रह केला तर आपण यासाठी तयार असल्याचं बेन स्टोक्स म्हणाला आहे.द टेलिग्राफच्या वृत्तानुसार बेन स्टोक्स वर्ल्ड कप खेळण्यासाठी आयपीएल 2024 सोडून द्यायलाही तयार आहे. 2019 वर्ल्ड कपनंतर स्टोक्सन फक्त 9 वनडे मॅच खेळल्या. 32 वर्षांच्या स्टोक्सने 105 वनडेमध्ये 2,924 रन केल्या, याशिवाय त्याने 74 विकेट घेतल्या.इयन मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंडने 2019 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला, तेव्हा फायनलमध्ये बेन स्टोक्सेने उत्कृष्ट बॅटिंग केली. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात स्टोक्सेने 84 रनची मॅच विनिंग खेळी केली होती.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button