ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

जागतिक महिला दिनानिमित्त पुरंदर तालुक्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान


पुरंदर : ( आशोक कुंभार )भारजागतिक महिला दिनानिमित्त पुरंदर हायस्कूल, सासवड या ठिकाणी पुरंदर तालुका माध्यमिक महिला शिक्षक संघ व तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक , शिक्षक संघांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ – सावित्री गौरव पुरस्कार 2023 वितरण सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला . तालुक्यातील सत्कारार्थी , त्यांचे नातेवाईक , सहकारी , हितचिंतक, तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर संघांचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी सोहळ्यासाठी उपस्थित राहिले , त्याबद्दल पुरंदर तालुका माध्यमिक महिला शिक्षक संघाच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार, त्याचबरोबर सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तालुका आणि जिल्हा संघांमधील पदाधिकारी , आम्हां सर्वांना नेहमीच मार्गदर्शन करणारे आम्हां सर्वांचे उच्चपदस्थ मान्यवर यामध्ये प्राचार्य , मुख्याध्यापक यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले यामुळे हा सोहळा संपन्न झाला , यामध्ये विशेष मोलाचे मार्गदर्शन लाभले ते आदरणीय श्री .सागर सर, श्री . सय्यद सर, श्री . ताकवले सर आणि मोलाचे सहकार्य लाभले ते श्री . पापळ सर , श्री. रोकडे सर, त्यामुळे पुरस्कार वितरण सोहळा आनंदात पार पडला . त्याचबरोबर आदरणीय श्री.राजेंद्र बडे सर , सौ . उज्वला बडे मॅडम यांचे कडून संगीत मंच प्राप्त झाला ,आदरणीय श्री.जगदाळे यांचेकडून पुरस्कार सोहळ्यासाठी सत्कारार्थी महिलांना सत्कार स्वरूप म्हणून दिले गेलेले सन्मानचिन्ह , सन्मानपत्र , बुके आणि पुस्तक यासाठी सौजन्य प्राप्त झाले म्हणून याठिकाणी त्यांचे विशेष आभार . आपणां सर्वांच्या सहकार्यातून हे सर्व आम्ही करू शकलो त्यामुळे पुरंदर तालुका माध्यमिक महिला शिक्षक संघाच्या वतीने आपणां सर्वांचे मनःपूर्वक ऋण आणि आभार .

अध्यक्षा : सौ .वर्षा अशोक देसाई

1)श्रीम् .आनंदीकाकी चंदुकाका जगताप – अध्यक्षा श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ
2)सौ.मीनाताई दत्तात्रय शेंडकर -सहाय्यक संचालक शिक्षण विभाग महाराष्ट्र
3)श्रीम्. सुरेखा विठ्ठल ढवळे -प्रदेशाध्यक्ष प्रहार संघटना
4) सौ.मेघा किर्तीकुमार मेमाणे-लेखनिक ममता बालसदन कुंभारवळण
5)नूतनअभिजीत गोसावी-आरोग्यसेविका ,चिंतामणी हाॅस्पिटल
6)श्रद्धा प्रविण जोशी-पत्रकार दै.सकाळ
7)रोहिणी प्रकाश पवार-आशासेविका वाल्हे
8)उर्मिला मारूती झगडे-वाहक(MSRTC)
9)प्रतिक्षा तुकाराम मुळीक-राज्य कर निरीक्षक


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button