आशा व गट प्रवर्तक ना 1500रू. वाढ प्रस्ताव मंत्री मंडळ ला , लवकर च निर्णय अपेक्षीत..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


महाराष्ट्र राज्य आशा- गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती

आशा व गट प्रवर्तक ना 1500रू. वाढ प्रस्ताव मंत्री मंडळ ला , लवकर च निर्णय अपेक्षित_ डॉ पी एम पाडवी सहसंचालक आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान यांची घोषणा…

मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे भव्य मोर्चा व तीव्र निदर्शने
राज्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक कृती समिती वतीने आयोजित करण्यात आले होते. , नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर 11 ऑक्टोबर 2022 रोजी आझाद मैदान मुंबई येथे भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चाच्या माध्यमातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्या शासना पर्यंत पोहोचलेल्या आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची घोर निराशा केंद्र शासनाने केली आहे .आता राज्य शासनाकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार शासनाने करावा, इमाने इतबारे व अल्प मोबदल्यात काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांना त्यांच्या मेहनतीच्या तुलनेत शासकीय कर्मचार्‍याचा दर्जा देण्यात यावा. किमान वेतन लागू करा, मोबदल्यात काटछाट न करता पूर्ण मोबदला द्या, केंद्रशासन व राज्य शासनाचा एकत्रित व दरमहा नियमित मोबदला देण्यात यावा, आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना 8.33% प्रमाणे दिवाळी बोनस द्या, कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन सुसूत्रीकरण लागू केले आहे, त्याचप्रमाणे गटप्रवर्तकांनाही कंत्राटी कर्मचारी म्हणून घोषित करा व वेतन सुसूत्रीकरणाचे सर्व लाभ गटप्रवर्तकांना द्या, मोबदल्यामध्ये भरघोस वाढ करा, कामावर आधारित मोबदल्याचे दर हे फार जुने आहेत ते दर आता दुप्पट करा, या व इतर विविध मागण्या बाबत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे 8 मार्च 2023 रोजी भव्य मोर्चा व तीव्र निदर्शने आयोजित करण्यात आले होते. ते सकाळी 11 वाजे पासून आंदोलनं आझाद मैदान मुंबई येथे सुरु झाले.. एकीची वज्रमुठ घट्ट करून घोषणा सुरु होत्या. आंदोलन पाठिंबा काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, आ. धीरज देशमुख, आ. पी एम पाटील आदि ५ आमदार यांनी पाठिंबा दिला. आयट क राष्ट्रीय सचिव कॉ सू कुमार दामले, राष्ट्रीय सचिव आयटक बबली रावत यांनी पाठिंबा दिला. आझाद मैदान येथे महाराष्ट्र शासनाने आरोग्य भवन चे सह संचालक डॉ पी एम पाडवी , स्वाती पा टी ल आले . डॉ पाडवी यांनी आशा व गट प्रवर्तक यांना १५००रू. मानधन वाढ प्रस्ताव आरोग्य विभाग ने मंत्री मंडळ दिला आहे. आरोग्य मंत्री नी पाठवले आहे. इतर प्रश्न बाबात येणाऱ्या काळात चर्चा करू असे आश्वासन दिले व नवीन मानधन वाढ निर्णय लवकर च होईल. आशा व गट प्रवर्तक ना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यांना निवेदन देण्यात आले.
राज्य भरातील आशा व गट प्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी होते. या प्रसंगी राजू देसले, एम ए पाटील, आनंदी अवघडे, भगवान देशमुख, श्रीमंत घोडके, सुवर्णा कांबळे, निलेश दात खीले, मुगाजी बुरुड, उज्वला पडीलवर, भगवान दवणे, सुनीता कुलकर्णी, समीरा शेख , भगवान दवणे, राजेश सिंग आदि उपस्थित होत्या मार्गदर्शन केले.