प्रियकराच्या त्रासाला कंटाळून सोलापुरात विवाहितेची आत्महत्या

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


सोलापुर : (आशोक कुंभार ) सोलापुरातील जुना विडी घरकुल परिसरात प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर सोलापुरात हळहळ क्यक्त होत आहे.कविता कल्याणम असे आत्महत्या केलेल्या या विवाहितेचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसांनी प्रियकर संजय राठोड (रा. विजय ब्रह्मनाथनगर, मुळेगाव रोड, सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

दोन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमाचा शेवट अखेर प्रेयसीच्या मृत्यूने झाला आहे. दोघांतील प्रेमाचे संबंध संपले असले तरी संदीप राठोड विवाहितेचा पिच्छा सोडत नव्हता. त्यामुळे विवाहित प्रेयसीने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. 5 मार्चला संदीप राठोड मध्यरात्री विवाहितेच्या घरी आला. बराचवेळ दार ठोठावत होता. कविताने दार उघडले नाही. तरी तो दार ठोठावत राहिला, अखेर तिने दार उघडलं. संदीप घरात आला आणि कविताला बेदम मारहाण करू लागला. ‘मला सोडू नकोस,’ असे सांगून तो रात्री निघून गेला. 6 मार्चला पहाटे विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली, अशी फिर्याद एमआयडीसी पोलीसांत दाखल झाली आहे.

कविताचा पती कोरोना महामारी सुरू होण्याअगोदर रोजगाराच्या शोधात तामिळनाडू येथे गेला होता. त्यावेळी कविता आणि शेजारी राहणाऱ्या संदीप राठोड यांचे प्रेमसंबंध जुळले होते. ही बाब कविताच्या पतीला कळल्यानंतर पतीने समज देत असं पुन्हा होऊ नये, अशी ताकीद कविताला दिली होती. कविताच्या आईनेदेखील समज दिली होती. त्यानंतर दोघांतील प्रेमप्रकरण संपुष्टात आले होते. त्यानंतर कविता ही सासरकडील घर सोडून जुना विडी घरकुल परिसरात राहावयास आली होती. मात्र, प्रियकर संदीप राठोड हा कविता कल्याणमची पाठ सोडत नक्हता. शेवटी कविताने जीवनयात्राच संपवली आहे. कविताला 11 वर्षांचा मुलगादेखील आहे.

संदीप राठोड वारंवार कविताला त्रास देत होता. याला कंटाळून कविताने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती कविताच्या नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली होती. पोलिसांनी आरोपीला अटक करावी, अशी मागणीदेखील केली आहे.