भाजी विक्रेता अचानक कोट्यधीश

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


उत्तरप्रदेश: (आशोक कुंभार ) माणूस दिवसरात्र कष्ट करून पैसे कमवतो, जेणेकरून आपल्या कमाईने त्याला त्याची स्वप्ने साकार करता येतील. याकरिता पैसे कमावण्यासाठी लोक विविध प्रकारचे व्यवसाय करतात, पण एकदा असे घडले की, अचानक तुमच्या खात्यात इतके पैसे आले आणि तुम्ही अब्जाधीश झालात?

ही गोष्ट ऐकायला विचित्र वाटेल पण हे खरे आहे. एका भाजी विक्रेत्याबाबत असे घडले की, तो काही क्षणांतच 172 कोटींचा मालक झाला.

उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यामधील एका भाजी विक्रेत्याच्या खात्यामध्ये अचानक 172 करोड 81 लाख 59 हजार रुपये जमा झाले. आयकर विभागाकडून नोटीस आल्यानंतर या भाजी विक्रेत्याला खात्यामध्ये एवढे पैसे असल्याचे समजले. विनोद रस्तोगी असे या भाजी विक्रेत्याचे नाव आहे. आयकर विभागाकडून कर न भरल्याची नोटीस आल्यानंतर त्यांच्या पाया खालची जमीनच सरकली. चौकशी केल्यानंतर खात्यात 1 – 2 कोटी नसून कोट्यवधी रुपये असल्याचे सांगितले. ‘मी साधा भाजी विक्रेता असून दिवसाला 200 ते 300 इतकीच कमाई होते. या कमाईमध्ये माझे कुटुंब मोठ्या कष्टाने चालवू शकतो.’ असे विनोद रस्तोगी यांनी सांगितले. त्यामुळे हे पैसे आपले नसून याबाबत चौकशी करण्यात यावी, यासाठी रस्तोगी यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली.

चौकशीनंतर खरा प्रकार समोर आला. विनोद रस्तोगी यांच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डचा गैरवापर करून नवीन खाते उघडले. त्यानंतर खात्यात धनादेशाद्वारे मोठी रक्कम जमा करण्यात आली. आता या प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे सोपविण्यात आला आहे.