ताज्या बातम्यामहत्वाचेराजकीय

स्वपक्षीयांचा आदर कसा करावा, हे भाजपकडून शिकावे


भारत: (आशोक कुंभार ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांचा ज्या प्रकारे सत्कार केला, त्यापासून सर्व राजकीय पक्षांनी भाजपाकडून शिकले पाहिजे. काँग्रेसने नेहमीच आपल्या दिग्गज नेत्यांचा अपमान केल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री Amit Shah अमित शाह यांनी केली मे महिन्यापर्यंत कर्नाटकात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पृष्ठभूमीवर कर्नाटकातील बिदर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, एस. निजलिंगप्पा असो की माजी मुख्यमंत्री वीरेंद्र पाटील असो, काँग्रेसने नेहमीच स्वपक्षीय नेत्यांचा अपमान केला आहे. भाजपातच दिग्गज नेत्यांना सन्मानाची वागणूक मिळते, असा दावा त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच कर्नाटकात होते आणि त्यांनी लोकांसमोर येदीयुरप्पा यांचा ज्या प्रकारे सत्कार केला, ते सर्व राजकीय पक्षांनी शिकले पाहिजे, असेही Amit Shah अमित शाह म्हणाले.



काँग्रेस आणि आपचा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले की, राहुल गांधींच्या काँग्रेसला काय झाले आहे, तेच कळत नाही. ते ‘मोदी तेरी कबर खुदेगी’, अशा घोषणा देत आहेत. आम आदमी पार्टी सुद्धा ‘मोदी मर जा’ असा नारा देत आहे. अशा नार्‍यांनी काहीही लाभ होणार नाही. कारण, पंतप्रधानांना जनतेचा आशीर्वाद आहे. तुम्ही जितकी जास्त चिखलफेक कराल, तितके कमळ अधिक फुलेल, असेही Amit Shah अमित शाह यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button