ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

तुमच्या पोटदुखीवर आमच्याकडे जालीम औषध’, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोमणा


मुबई: (आशोक कुंभार ) ‘निवडणुकासमोर ठेवून आम्ही काम करत नाही. अजितदादा तुम्ही गोड बोलतात, पण तुमच्या कार्यक्रम सुरू असतो. त्यामुळे पोटदुखीचे प्रसंग वारंवार येतील, त्यामुळे जालीम औषध शोधून ठेवले आहे बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू केला आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना लगावला. विधान सभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विरोधकांना चांगलेच चिमटे काढले. ‘सत्तेतून पायउतार झाल्यानंतर तुमच्या डोळ्यात अंधारी आली आहे.



त्यामुळे आमचे काम दिसत नाही. दिसत असलं तरी तुम्ही बोलत नाही. चांगल्याला चांगलं म्हणण्याचं विरोधकांचं काम आहे, तुमचं मोती बिंदूचं ऑपरेशन करावं लागेल’, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. ‘अडीच वर्षांमध्ये सगळे प्रकल्प थांबले होते.

तुम्ही सुद्धा होता तिथे, पुढील दोन वर्षांमध्ये सर्व प्रकल्प मार्गी लावणार आहे. महाराष्ट्रापुढे नवीन चित्र निर्माण करणार आहे. या राज्यातील इन्फ्रा प्रकल्प सादर करणार आहोत’, असंही शिंदे म्हणाले. ‘दावोसमध्ये मागच्या वेळी 50 हजार कोटींचे करार झाले होते.

त्या कंपनीचे नाव घेत नाही, पण एकाही कंपनीची गुंतवणूक झाली नाही. दिल्लीची कंपनी होती. सामजस्य करार होते, आपल्याकडे गुंतवणूक मोठी येईल, असंही शिंदे म्हणाले. दावोसमध्ये ४२ कोटी रुपये खर्च झाले बोलतात पण प्रत्यक्षात ३५ कोटी रुपये खर्च झाले आहे.

महाराष्ट्र पॅव्हिलियेन सर्वात चांगले होते. मागच्या वर्षा मध्य प्रदेश पॅव्हिलियेनमधून खूर्चा आणि टेबल आणावे लागले होते. आमच्याकडे जागा आहे, इंडस्ट्रीसाठी जागा आहे, सोईसुविधा आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर आपल्याकडे गुंतवणूक सुरू झाली आहे. आता आपल्याकडे रोजगार निर्माण झाले आहे, असं आश्वासनही शिंदेंनी दिलं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button