बीड मोफत त्वचारोग तपासणी व समुपदेशन शिबिराचा लाभ घ्या – डॉ.पूनम भालेराव

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड : शहरातील स्किनोवेशन क्लिनिक, स्किन, हेअर अँड लेसर सेंटर, बी.एच.एम.एस. कॉलेजच्या बाजूस, सिद्धी फोटो स्टुडिओ शेजारी, माने कॉम्प्लेक्स रोड, बीड येथे दिनांक ०५ मार्च २०२३ रविवार रोजी सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०५:०० पर्यंत मोफत त्वचारोग तपासणीसह समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचा गरजवंत रुग्णांसह होळी निमित्ताने धुळवड साजरी करण्याअगोदर लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. पूनम भालेराव यांनी केले आहे.

शिबिरामध्ये पिंपल्स (मरूम), वांग, चेहऱ्यावरील सुरकुत्या, डोळ्याखालील काळे डाग, कोरडी त्वचा, नखांचे आजार, गजकर्ण, पांढरे डाग (कोड), सोरियासिस, स्ट्रेच मार्क (व्रण), त्वचेचे सर्व आजार, सनटेन ट्रीटमेंट, स्कीन टायटनिंग, केस गळती, केसातील कोंडा, केसांची वाढ खुंटणे, हायड्रोफेशियल (ॲडव्हान्स मशीनद्वारे), मायक्रो नीडलिंग, पी.आर.पी. (केसांसाठी व त्वचेसाठी), लेझर मशीनद्वारे शरीरावरील अनावश्यक केसांसाठी उपचार, टॅटू-गोंदण काढणे, केमिकल पिलिंग, मस-चामखीळ काढणे, इत्यादींची तपासणी शिबिरात मोफत केली जाणार आहे. शिवाय येत्या होळी व धुळवड सणानिमित्ताने वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या रंगासह वार्नेस आणि तत्सम पदार्थ एक दुसऱ्यास लावताना आवश्यक दक्षता बाळगणे, कोणते रंग वापरावे, कोणते वापरू नये, कोणते रंग चांगले असते व कोणत्या रंगांमुळे त्वचेला हानी पोचू शकते आदींबद्दल माहिती देऊन समुपदेशन सुद्धा करण्यात येणार आहे. याकरिता रुग्णांसह होळी व धुळवड साजरे करणाऱ्यांनी ८०८०९७३५९८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करावी किंवा शिबिरापूर्वी स्किनोवेशन क्लिनिक, स्किन, हेअर अँड लेसर सेंटर, बी.एच.एम.एस. कॉलेजच्या बाजूस, सिद्धी फोटो स्टुडिओ शेजारी, माने कॉम्प्लेक्स रोड, बीड येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा. असे आवाहन डॉ. पूनम भालेराव यांनी केले आहे.