ताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

होळी जवळ येताच सोन्याच्या दरात वाढ


मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत होती. आज मात्र सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे तर चांदीचे दर मात्र स्थिर आहे. येत्या काही दिवसावर होळी आहे आणि तुम्ही जर होळीच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोने तुम्हाला महागात पडण्याची शक्यता आहे.
गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,600 रुपये तर 24 कॅरेट साठी 56,200 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 668 रूपये आहे. (Gold Silver Price update 2 march 2023)देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई – 57,110 रुपये

दिल्ली – 56,440 रुपये

हैदराबाद – 56,290 रुपये

कोलकत्ता – 56,290 रुपये

लखनऊ – 56,440 रुपये

मुंबई – 56,290 रुपये

पूणे – 56,290 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button