ताज्या बातम्या

अयोध्येतील विमानतळाचे नाव बदलणार; ‘मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम विमानतळ’च्या जागी ‘हे’ नाव देणार


अयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. अनेक अतिमहत्वाच्या व्यक्ती सोहळ्यानिमित्त येथे येणार असल्यामुळे प्रचंड विकासकामेही सुरू आहेत.



रेल्वे स्थानकापासून विमानतळापर्यंत प्रत्येक ठिकाणाचे रूपडे पालटताना दिसते आहे.

अयोध्येतील नवीन विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ (Ayodhya International Airport) आहे. त्याचे नाव मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम विमानतळ आहे. मात्र आता विमानतळाचे हे नाव बदलले जाणार असल्याची चर्चा आहे.

विमानतळाला आता ‘महर्षि वाल्मिकी’ यांचे नाव दिले जाण्याची शक्यता आहे. त्याकरता उत्तर प्रदेश सरकारकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. लवकरच त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम विमानतळावरून लवकरच देशातील प्रमुख शहरांमधील विमानसेवा सुरू केली जाणार आहे.

६ जानेवारीपासून सेवा सुरू होणार आहेत आणि त्याच्या साधारण आठवडाभर अगोदर म्हणजे ३० डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या विमानतळाचे उदघाटन करणार आहेत.

अलिकडेच म्हणजे २२ डिसेंबर रोजी अयोध्य विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या एअरबस ए-३२० चे यशस्वी लँडींग झाले होते. अयोध्येच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची घटना आहे. नवीन विमानतळ सुरू झाल्यामुळे अयोध्या नवीन हवाई यात्रा केंद्र म्हणून प्रस्थापित होणार आहे.

अलिकडेच नागरी हवाई वाहतूक खात्याचे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले होते की परदेशातून अयोध्या येथे होणाऱ्या प्रवाशांना अयोध्येच्या ऐतिहासिक महत्त्ततेची झलक दाखवली जाईल. त्यामुळे येथील विमानतळ केवळ एक विमानतळ असता कामा नये तर येथील संस्कृतीचा तेथे समावेश करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

https://www.navgannews.in/dharmik/36871/


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button