ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल


मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची महत्त्वाची बातमी समोर येतय. शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जरांगे पाटलांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रात्रीच रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे.



छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मनोज जरांगे यांना अशक्तपणा जाणवत असल्यामुळं त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. तिथे दोन दिवस त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती समोर येतेय. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सभा घेत आहेत. रात्रंदिवस जरांगे पाटील राज्यातील विविध कानाकोपऱ्यात जाऊन सभा घेत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जरांगेंनी उपोषण सोडलं होतं. उपोषणादरम्यानही त्यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले आहेत.आंदोलकांसोबत संवाद साधत असताना ते अचानक स्टेजवर कोसळले होते. त्यानंतर आता त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जरांगे पाटील यांना दोन दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार असून त्यानंतर सुटी देण्यात येणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button