देश-विदेश

सर्वात मोठा हिमखंड तुटला आहे. याचा आकार न्यूयॉर्कपेक्षा तिप्पट मोठा,वैज्ञानिक टेन्शनमध्ये


अंटार्क्टिकामध्ये (Antarctica) जगातील सर्वात मोठा हिमखंड तुटला आहे. याचा आकार न्यूयॉर्कपेक्षा तिप्पट मोठा आहे. तुटलेला हिमखंड दक्षिण महासागराच्या दिशेने सरकला आहे.हा हिमखंड अंटार्क्टिकामधील अनेक जीवांसाठी धोकादायक ठरु शकतो. A23a असे या हिमखंडाला नाव देण्यात आले आहे.

अंटार्क्टिक हिमखंड सुमारे 4,000 चौरस किमी (1,500 चौरस मैल) मध्ये पसरलेला आहे. एकूणच हा हिमखंड शहराच्या आकारापेक्षा तिप्पट मोठा आहे. A23a जगातील सर्वात जुन्या हिमखंडांपैकी एक आहे. 1986 मध्ये पश्चिम अंटार्क्टिकापासून फिल्चनर-रोन आइस शेल्फपासून दूर गेल्यानंतर कोणतेही हिमखंड तुटलेले नाहीत. सॅटेलाईट इमेजच्या मदतीने तुटलेल्या हिमनगाचे आकारमान काढण्यात आले आहे. सुमारे एक ट्रिलियन मेट्रिक टन वजनाचा हा हिमखंड जोरदार वारा आणि प्रवाहाच्या झोतामुळे अंटार्क्टिक द्वीपकल्पाच्या उत्तरेकडील टोकाकडे वेगाने सरकत आहे. तज्ज्ञ या तुटलेल्या हिमनगाच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.

या आकाराचा हिमखंड दिसणे अत्यंत दुर्मिळ असल्याचे अंटार्क्टिक सर्वेक्षणातील हिमनगशास्त्रज्ञ ऑलिव्हर मार्श म्हणाले. शास्त्रज्ञ त्याच्या हालचालींचे बारकाईने निरीक्षण करत आहेत. अंटार्क्टिकामधील पश्चिम भागातील रोन्ने आईस सेल्फमध्ये असणारा हा महाकाय हिमनग तुटताना युरोपीय स्पेस एजन्सीच्या उपग्रहाच्या छायाचित्रांमध्ये दिसून आला आहे. हा हिमनग तुटल्याने जगभरात चिंता पसरली आहे.

हा हिमनग तुटल्यानंतर दक्षिण जॉर्जिया बेटाजवळील समुद्रात तरंगत आहे. हा हिमनग तुटल्याने किंवा स्खलन झाल्याने थेट समुद्रातील पाणीपातळी वाढ होम्याची भिती व्यक्त केली जात आहे. अप्रत्यक्षपणे पाणीपातळीत नक्की वाढ होऊ शकते. तसेच यामुळे हिमनगांचा वेग आणि बर्फाचा प्रवाह कमी होऊ शकतो. अंटार्क्टिकातील भूभाग हा पृथ्वीवरील अन्य भुभागांच्या तुलनेत वेगाने तप्त होत असल्याचा इशारा या सेंटरनं दिला आहे. अंटार्क्टिकामध्ये बर्फाच्या स्वरुपात इतके पाणी साठलेले आहे की हा बर्फ जर वितळला तर जगभरातील समुद्रामधील पाणीपातळी (Water Level) २०० फुटांपर्यंत वाढू शकते अशी देखील भिती व्यक्त केली जात आहे.

ही तुटलेला हिमखंड अंटार्क्टिकाच्या वन्यजीवांसाठी धोकादायक ठरु शकतो. लाखो सील, पेंग्विन आणि समुद्री पक्षी बेटावर प्रजनन करतात आणि आसपासच्या पाण्यात राहतात. याचा परिणाम या जीवांवर होवू शकतो.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button