ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

दहावीचा उद्या लागणार निकाल, कसा पाहावा निकाल


दहावीचा निकाल २ जूनला जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया लवकर करता येणार आहे.



अखेर निकालाची तारीख जाहीर झाली आहे. उद्या म्हणजे २ जूनला दहावी परीक्षेचा निकाल दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरुन विद्यार्थी निकाल पाहू शकणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावीची परीक्षा घेण्यात आली. मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावीची लेखी परीक्षा गुरुवार २ मार्च २०२३ ते शनिवार, दिनांक २५ मार्च २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी एकूण १५,७७,२५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये ८.४४.१९६ विद्यार्थी ७,३३,०६७ विद्यार्थीनी आहेत. एकूण २३,०१० माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे.

अकरावी प्रवेशाची घाई होणार- कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे ऑफलाईन शिक्षण खंडित झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल कसा लागणार आहे, याची उत्सुकता आहे. अनेक विद्यार्थ्यांनी निकालाचा आनंद साजरा करण्यासाठी आतापासूनच तयारी केली आहे. दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची घाई करावी लागणार आहे. कारण, प्रत्येक कॉलेजचा व मनपंसत कॉलेजचा कटऑफ वेगवेगळा असतो.

या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल :

www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
https://hscresult.mkcl.org
https://hsc.mahresults.org.in
निकाल करा डाऊनलोड: वेबासाईटवर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकणार आहे. वेबसाईटवर देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना रोल नंबर किंवा आईचे नाव टाकून दहावीच्या बोर्डाचा निकाल पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी ज्या वेबसाईट देण्यात आल्या आहेत, त्यातून निकाल डाऊनलोड करू घेता येणार आहे. यामध्ये या विद्यार्थ्याचे नाव, शाळा क्रमांक, केंद्र क्रमांक, आईचे नाव, प्रत्येक विषयात मिळालेले गुण, एकूण गुण आणि टक्केवारी दिली असणार आहे.

कसा पाहावा निकाल : दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आधी वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर होमपेजवर दिसणाऱ्या एसएससी निकालाच्या लिंकवर क्लिक करावे.त्यानंतर विचारण्यात आलेली माहिती त्या ठिकाणी भरा.त्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर येईल. तो निकाल डाऊनलोड करा.विद्यार्थी मार्कशीट देखील डाऊनलोड करू शकतील. दहावीचा निकाल लागल्यानंतर कमी गुण मिळाले अथवा नापास झाले तरी निराशा टाळून प्रयत्न करता येतात. त्यामुळे निराश न होता पुन्हा तयारी करावे, असे शिक्षणतज्ज्ञ सल्ला देतात.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button