तुला शेतीमधलं काय कळतंय’; शिंदेंनी सुनावलं

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

मुंबई | विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी कापसाची टोपी, कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं. विरोधकांनी विधान परिषदेचं कामकाज रोखून धरलं. दिवसभरासाठी विधान परिषद सभागृह तहकूब करण्यात आलं.
कांदा प्रश्नावरून विरोधकांनी आज सरकारची चांगलीच कोंडी केली. कांद्याला भाव मिळालाच पाहिजे. कापसाला भाव मिळालाच पाहिजे. हरभऱ्याला भाव मिळालाच पाहिजे. दोन रुपयाचा चेक देणार्‍या सरकारचा निषेध असोृ, अशा घोषणा देत विरोधकांनी विधान भवनाचा परिसर दणाणून सोडला.

तीच परिस्थिती विधानसभेतही होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी खाली बसूनच मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टिप्पणी केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ए बस खाली, तुला शेतीमधलं काय कळतंय’ असे म्हणत त्यांची विकेट काढली. इतके झाल्यावर फलंदाजीस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले उभे राहिले.